Saturday, June 30, 2007

तेरेखोल ते विजय्दुर्ग - सफ़र इMधुदुर्ग किनार्‍याची

१ मे २००७ ला आम्ही सिMधुदुर्ग च्या सफ़रीवर गेलो होतो तेव्हा टिपलील काहि फोटो








काही आठवणी.......

दिवाळीचे दिवस होते उद्या पासुन दिवाळीची सुट्टी सुरू होणार होती. बरोबर दुचाकी सातार्‍यात नेली होती त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत पुण्याला येण्याऐवजी चिपळुनला जाण्याचे ठरवले. आंधार पडायच्या आत पोहोचण्याच्या उद्देशाने ३ च्या सुमारास ऑफीस सोडले, रुम वर जाउन दोन दिवसांसाठी लागणारे कपडे घेतले. सातार्‍याचे पेढे पुजेसाठी घेतले. वेगाने सातारा मागे टाकत उंब्रज च्या दिशेने सुसाट सुटलो, उंब्रज्ला पुरेसे पेट्रोल टाकले, सुंदर रस्त्याने सुसाट वेगाने गाडी हाणली. वाटेत काही लहान गावे लागतात. कोयननगरच्या अलीकडे एक गाव लागते. संध्याकाळ होत आली होती. अचानक कोंबड्यांचा समुह रस्त्यावर घुसला मनात कोणताही ब्रेक दाबायचा विचार न येऊ देता त्याच वेगाने घुसलो एक कोंबडी मझ्या पायावर आदळली आणी तिथेच तडफडत पडली बाजुच्या घरातुन ३ / ४ लोक धावत आले पण एक क्षणही न थांबता तिथुन पोबारा केला. मी जर ब्रेक दाबला असता किंवा थांबलो असतो तर माझी अवस्था त्या कोंबडी सारखी झाली असती. पुढे थेट कुम्भार्ली च्या घाटमाथ्यावर थांबलो एका टपरीवर चहा पिला. सुर्यस्त झाला होता. तरी आजुनही बराचसा उजेड होता. सावकाश घाट उतरलो. पायथा गाठेपर्यंत आंधार पडला होता. इतर गाड्याच्या लाईटचा प्रखर प्रकाश्झोतात हेल्मेट ची काच लाऊन गाडी चालवणे अवघड वाटु लागले म्हणुन विना हेल्मेटची गाडि चालवू लागलो. ह्या दिवसात भात कापणी जोरदार सुरू असते. संध्याकाणी शेतातले असंख्य किटक उडत असतात. गाडी वेगात तर सोडुनच द्या पण नुसती चालवणे पण मुश्किल झाले. दर किमी ला थांबा घेउन डोळ्यात जणारे किटक बाहेर काढावे लागत होते. परत हेल्मेट चढवले आणि सावकाश चिपळुन शहरा जवळ येउन पोहोचलो. मामाचे नेहमीचे घर बदलले होते. सातार्‍यातुन चिपळुन्ला घरी पोहोचायला साडेतीन तास लागले. घरी फोन करून मी सुखरूप पोहोचल्याचे सांगीतले.

सकाळी अभ्यंग स्नान केले व परत त्याच दिवशी पुण्यात येण्याचे ठरवले. असे अचानक मनात का आले माहीत नाहि. पण मामाची परवानगी घेतली. मस्त सोलकधी डाळिम्ब्याची उसळ खीर, श्रिखंड असा मेनु हादडला आणि थेट पुणॅ गाठायचे ह्या उद्देशाने २ वाजता चिपळुन सोडले. गाडीमधे पुरेसेच पेट्रोल टाकून कुम्भार्ली घाट ओलांडला आणी गाडी अचानक गचके देत बंद झाली. माझा माहीती प्रमाणे मी गाडीची तपासणी केली. काही किक्स मारल्यावर गाडी सुरु झाली उम्ब्रजच्या दिशेने प्रवास सुरू केला. नंतर लक्शात आले की एका ठरावीक वेगा पेक्शा अधी वेगाने गाडी चालवली तर ती बंद होते आहे. मग पुढचा प्रवास २० - ३० घ्या वेगाने.

उम्ब्रज ला हाय्वे वर आलो. गाडी हळु हळु वेग धरु लागली होती. २ लांब आकाराचे ट्रेलर रस्ता व्यापुन एका पुढे एक चालले होते. मला गाडी चालवताना त्याच्या धुराचा त्रास होत होता. म्हणुन आजुन वेग ४० वरुन ६५ पर्यंत वाढवुन एकाला मागे टाकले दुसराही ओलांडत चालकाच्या केबीन शेजारी आलो. आणी गाडीचे इंजीन एकदम बंद झाले. मागुन काही गाड्या भरगाव वेगाने येत होत्या पण मधे काही अंतर होते. त्या क्शणी मला जे काही जमले ते मी केले. प्रथम गाडीचा उजव्याअ बाजुचा इंडीकेटर चालू केला आणी गाडि दुभाजकाच्या एकदम बाजुने कडेला घेतली, मागुन येणार्या गाड्यांना त्यामुळे एकदम बाजुने निघुन गेल्या. त्या ट्रेलर वाल्याला माझ्या गाडीत काहीतरी घोटाळा असल्याचे जाणवुन त्याने त्याची गाडी रस्त्याच्या अधीक कडेला घेतली त्या मुळे मागुन येणार्‍या बाकीच्या मोठ्या गाड्यांना पुढे येण्यासाठी व्यवस्थित जागा मिळाली. इंजीन बंद झाले तरी न्य्ट्रल वर घेतल्या मुळे आणी उतारामुळे गाडी चालतच होती. गाडी रस्त्याच्या एका बाजुला घेतली. इंजीन खुप गरम झाले होते. जरा वेळ थांबलो. गाडी सुरू केली आणी सावकाश सातार्‍यात पोहोचलो. संध्याकाळचे ६.३० वाजले होते. लक्ष्मी पुजन तिथेच केले आणी दुसर्‍या दिवषी पुण्याकडे पहाटे ५ लाच निघालो पण एकदम सावकाश. घरी ८ वाजता पोहोचलो.

गाडी गॅरेज मधे नेली कळाले की चोक ची वायर तुटली असल्याने हा सगळा प्रकार झाला.


काही फुले माझ्या अजोबाMच्या बागेतली..

काही फुले माझ्या अजोबाMच्या बागेतली..





सुर्योद्याचे काही फोटो

माझ्या घराच्या खिडकीतून काढलेले सुर्योद्याचे काही फोटो