Friday, July 27, 2007

Konkan

Message

कोकण!!

कोकणात येवा आंबोलीक जावा, धबधब्यात न्हावा!
मालवणचो बांगडो खावा, खाजा घेवा, दर्यात थोडे पेवा!!
चारय बाजुक दर्यो आणी किल्ल्यात पाणी गोड!
उगाच नाय सगळ्याका सिंधुदुर्ग किल्ल्याबद्द्ल ओढ!!

वाडीचो डोंगर चढा, मोती तलाव फिरा, खेळणी घेवा लाकडी!
आरवलीचो वेतोबा, रेडीचो गणपती बघुक वाट करा वाकडी!!
आंबे, फणस, जांभळा, काजु, कोकणचो मेवो!
शिपये, मुले, तिसरे खरो रत्नागिरीचोच ठेवो!!

डोंगरमळे शेती, पोफळी, माडार नारळाचो भार!
गाडयेत्सुन बघीत येवा सगळा हिरव्या हिरव्या गार!!
नापरे, आंबोली धबधब्यासाठी पावसात तुंम्ही येवा!
तेरेखोल खाडी बघताना फेरीबोटीचोय अनुभव घेवा!!

डोंगरदरे, शेतीमळे, पा

Monday, July 16, 2007

सारसबाग

मागच्या अठवड्यात सारसबागेमधे गेलो होतो तेव्हा घेतलेले काही फोटो......








Saturday, July 14, 2007

Monday, July 02, 2007

भटकंती किल्ले रोहीडा अर्थात विचित्रगड ची....

शनिवारी रत्री माझा मावस्भाऊ घरी आला. त्याचे सोमवार पासुन कॉलेज चालू होणार असे त्याने साMगितले त्यामुळे उद्या कोठोतरी जाण्याचे ठरव म्हणाला. टाईम्स मधे एका ग्रुप ने रोहिडा किल्ला ट्रेक बद्दल आवाहन केले होते. अंतर तर तसे फार लाMबचे नव्हते, म्हणुन मोटारसायकल वर जाण्याचा निर्णय घेतला. सकाळी मी तर लवकर उठलो शनीवारात त्याला घेण्यासाठी त्याचा घरी गेलो तर महाराज मस्त पैकी झोपलेलेच होते. मग त्याचे आवरून होई पर्यंत तिथेच बसलो एक तासभराची झोप झालीच. बाहेर पावसाची पिर्पिर चालू होतीच. सकाळी ७.३० ला शनिवार पेठ सोडली. सिMहगड रोड ने कात्रज बाय्पास ला वळुन थाMबलेल्या पावसाचे आभार मानत नविन बोगद्यातुन भन्नाट वेगाने शिवापुर गाठले. तिथे पहिला थाMबा घेतला हॉटेल कैलास मधे, बरेचशी प्रवासी मंडळी येथे थाMबुनच नाSटा वगैरे करून पुढचा प्रवास सुरू करतात, आम्हीही तेच केले. अतिशय सुरेख रस्ता थाMबलेला पाउस. हिरवा गार परिसर, बाजुने साठलेली पाण्याची डबकी, मातीच्या लाल रंगाने भरून वहाणारे ओढे, नाले, निरा नदी, भाटघर धरण असे पहातच भोर गाठले. अंतर ६० किमी. Appox (गाडीचा स्पिडोमीटर बंद होता) भोर पासुन पुढे माMढरादेवी च्या वाटेवर ४ किमी वर खानापुर गाव लागते, तिथुन उजवीकडे, रेहिड्याला जाणारा फाटा आहे माहीती दर्षक फलक आणी एक मोठी कमानही उभारलेली आहे. इथुन ३ किमी वर बाजारवाडी नावाचे खेडे गडाच्या पाय्थ्याचे गाव आहे. तिथे एका घराच्या बाहेर गाडी लावून गड चढायला सुरवात केली. पावसाची भुर भुर चालू झाली होती.

एक गावकरी छोकर्याने उत्साहाने म्हणाला " काय एवढ्या पावसाचे वरती जाताय ", आम्ही उत्तर दीले हा काय पाऊस हे का भुर भुर तर चालू आहे आणी वरती तर आजुन छानच असेल. त्यावर तो म्हणाला "हा हा जावा जाव वरती लैइ गंम्मत येईल बघा".

हळू हळू पावसाचा जोर वाढू लागला होता. डोग़राच्या एका सोMडेच्या पठारावर पोहोचलो समोरच्या डोMगरावरून अनेक फेसळत्या जलधारा उतरत होत्या. डोMगर उताराला गवताचा हिरवा रंग आजुन चढला न्वहता. कEमेरावर पावसाचे पाणी पडु नये म्हणुन छत्री उघडुन आजूबाजूच्या परीसराचे फोटो घेतले. अचानक वार्‍याच्या झोत एवढा वाढला की छ्त्री उघडी ठेवणेच अशक्य झाले. गडाकडे पाहीले तर तो पुर्णपणे ढगंमधे गुडूप झाला होता. वार्‍याचा जोर इतका वाढला की चालणेही अवघड वाटू लागले. मागुन काही लोक वरती येत आहेत असे दिसले.

तिथेच एका दगडाच्या आडोशाला बसलो. काही वेळातच ही मंडळी हातात मोठे पातेले, काही ताटे, आणी एक छोटासा स्टोव्ह घेऊन वर चढू लागली. एवढ्या तयारीने ही लोक आली आहेत तर काहीतरी अडोसा नक्कीच असेल वरती असा विचार करून आम्हीही त्याMच्या बरोबर चालू लागलो. वार्‍अ काही विश्राMती घेत नव्हता. वार्‍याबरोबर पावसाचे थेMब कानटोपीला इतक्या जोरात आपटत होते की जवळ फटाक्याची माळ वाजते आहे असाच आभास होत होता. आजुन कीती वर जायचे आहे ह्याचा काही अंदाजच येत नव्हता.

आम्ही दोघे ह्या मंडळीच्या पुढे चालू लागलो आमच्या मागे हा १५ ते २० लोकाMचा समुह चालू लागला. ढगाMमुळे आगदी १० -१५ फुटाMवरचेही दिसत नव्हते तर चिखलात मळालेल्या वाटा शोधणे अवघड जात होते. गडाची तटबंदी दिसली थोडी चढणीची वाट होती. गडाचा पहीला दरवाजा गाठला. दरवाजाची बंधणी गोमुखी प्रकारातली असुन दरवाजाचा आकार मात्र लहानसाच आहे. मोडलेल्या पायर्‍याMच्या वाटेवरुन वळणे घेत दुसर्या दरवाजा पाशी पोहोचलो. दरवाजावर दोन्ही बाजुला गजमुखाची शिल्पे आहेत तर दरवाजाच्या मागिल बाजुस भुयारी पाण्यचे टाके आहे.

दरवाज्यतुन पुढे गेल्यावर एक धव्जस्तMब लागतो तिथे किल्याची माहीती देणारा माहीती फलक लावलेला आहे. त्यानुसार हा किल्ला कृष्णाजी बंदलाMच्या जहागीरी मधे होता. शिवाजी महाराजाMनी बाMदलाना स्व्राज्यात सामील होण्याबद्दल मागणी केली होती ती बाMदलानी मानली नाही त्यामुळे रोहीड्यावर महाराजाMना स्वारी करावी लाग्ली. कृष्णाजी बाMदल मारला गेला. किल्ला स्व्राज्यात सामील झाला. ह्या बंदलाMच्या पदरी बाजीप्रभु देशपाMडेे सरदार्की करत होते, बंदलाMच्या पाडावा नंतर तेही महाराजाMना सामील झाले. किल्ले रोहिडा , विच्त्रगड किMवा बिनीचा किल्ला ह्या नावाने देखिल ओळखला जातो. इथुन तिकोण, राजगड हे किल्ले आणी रायरेश्वराचे पठार जवळच्या अंतरावर आहेत. गडाला सात बुरूज असुन तटबंदी मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहे. भैरोबाचे एक मंदिर असुन मंदिरा समोरच एक छोटे टाके आहे. सध्या मंदिराचा जिर्णोद्धारचे काम चालू आहे. मंदिराच्या मागिल बाजुने पुढे गेल्यावर एका मागे एक खोदून कढलेल्या टाक्याMची राMगाच आहे. झालेल्या पावसाने सर्व टाकी भर्भरून वाहून जात होती. किल्ल्याचा तटबंदीच्या वरुन किल्ला फिरायला सुरवात केली. पाउस ठाMबायचे नाव घेत नव्हता.

किल्ल्याच्या एका बुरुजावर RSS चे स्व्यंसेव्क इतक्या पावसातही तसेच डबे उघडुन त्याव्र तुटुन पडले होते. त्यंची कोठुन आलात वगैरे विचार्पुस करून आम्ही पुढे गेलो. गडावरुन खालचे काहीच दिसत नव्हते. ह्या पावसातही काही ठिकाणाचे फोटो काढायचा प्रयत्न केलाच. थोडे पुढे गेल्यावर किल्ल्याच्या परत त्या माहिती फलकापाशी पोहोचलो. किल्ल्याची पाहुन संपल्यचे लक्शात आहे. किल्ला तसा लहानसाच फक्त ५ एकर परिसर असलेला आहे. गडाच्या दरवजात काही वेळ उगाचच थाMबलो. दुपारचे २ वाजत आले होते. पावसाचा जोर थोडासाच कमी झाल्याचे जाणवले. किल्ला उतरताना मगपासुन किती पाउस झाला आहे ह्याच्या खुणा दिसू लागल्या. ज्या वाटेने वर चढलो होतो त्याचा अवखळ पाण्याने ताबा घेतला होता. त्याअतच डुबूक डुबूक उड्या मारत खाली उतरुन आलो. पाठीवरची बEग पाणी गेल्याने अधीकच वजनदार झाली होती. पावसाचा जोर बराच ओसरला होता त्यामुळे लगेच गडीवरून परतीचा प्रवास सुरू केला वाटेत एका ओढ्यावर थाMबुन काही फोटो काढले. पाउस पुन्हा लगेच सुरू झाला. तसेच भिजत पुणे-सातारा रोडवर आलो. एका ढाब्या वर मस्त्पैकी पोटभर जेवलो. पावसाने झोडायला सुरूवात केली होतीच. तसेच पुण्यापर्यंत दुपारी ४ वाजता पोहोचलो.
-PHDixit