हिंदुत्वाविषयी सांगोपांग चर्चा. by kedar

केदार | 19 June, 2010 - 02:29

ज्या समाजाचे भौतिक व अध्यात्मिक वैभव समजातिल सर्व स्थरांना, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने अनुभवता येते, तो समाज निरोगी राहतो, व हे जेव्हा अनुभवता येत नाही तेंव्हा तो रोगट होतो. (आजचा आपला समाज). वैदिक काळी (ज्यावर तुम्ही प्रश्न विचारला तो) सामाजिक जीवन निरोगी व प्रसन्न होते, ह्याचे पुरावे वेगवेगळ्या साहित्यात आढळून येतात. उदा ऋग्वेदाचे सुतकर्ते ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य ह्या तीन्ही विभागातील होते तर शुद्र हा समाज ऋग्वेदाचा शेवटच्या भागात प्रामुख्याने कर्ता समजला जातो. निषाद स्थगपतींच्या (गंवडी) व रथकाराच्या अनेक यज्ञसंहिता आज उपलब्ध आहेत. यज्ञसंस्थेत शूद्राचे स्थान मोठे होते. अगदी अश्वमेधाच्या यज्ञात पण वेदि रचताना, चारही वर्ण विविध कामे करतात.

महाऐतरेय उपनिषदात दासीपुत्रांचे वंशज कावषेय हे यज्ञाचे आध्यात्मिक रहस्य सांगणारे तत्वज्ञ असे सांगीतले आहे.
प्रसिद्ध षोडशकल ब्रह्माचा उदगाता सत्यकाम जाबाल हा दासीपुत्र आहे.
सर्वंगविद्या म्हणजे दृश्य विश्वाचा विलयनाचे तत्वज्ञान जानशृती राजास सांगणारा प्रसिद्ध रैक्व ऋषी गाडीवान होता. आणि जानशृती राजा स्वतः हा शुद्र राजा होता! (छांदोग्य ४/२)
विश्वरुपी वैश्वानर आत्म्याचे तत्वदर्शन सांगणारा अश्वपती कैकय ( कैकयीचा बाप) क्षत्रिय होता, प्रवाहण जैवालि व अजातशत्रु ते उपनिषिदाचे तत्ववेक्ते /काही अंशात रचिते हे क्षत्रिय होते.
ही फक्त काही उदाहरणं. जास्त खोलात न जाता. आजही तुम्ही कुठलेही उपनिषिद हातात घेतले तर वरिल नावे नेहमी येतात. कोणास अमेरिकेत हवे असतील तर मी द्यायला तयार आहे.

इंग्रजी वेदाभ्यासक डॉ डायसन ह्यांनी अनेक उपनिषिदांवरुन असे अनुमान काढले आहे की वेदविद्या ही मुख्यतः क्षत्रियांची होती, ब्राह्मणांची नाही. ब्राह्मन लोक वेद विद्या शिकावयास क्षत्रिय राजांकडे जात.
याज्ञवल्क व जनकाचे संभाषन प्रत्येक वेदअभ्यासकाला मार्गदर्शक ठरते, तर हा याज्ञवल्क ब्राह्मण तर जनक (सीतेचा बाप) हा क्षत्रिय. याज्ञवल्काची बायको मैत्रेयी हिने मैत्रायनी संहिता लिहली आहे व त्याच जनकाच्या सभेत असणारी गार्गी हिने याज्ञवल्कास अनेक प्रश्न विचारुन सतावून सोडले होते. ऋग्वेदातील २६ सुक्त ही स्त्रियांनी लिहलेली आहेत. श्रद्धा, वैवस्वती यमी, आत्रेय, विश्वधारा, अपाला, घोषा, सूर्या, शची, अधिती, वाक् अश्या स्त्रियांनी वेद व उपनिषिदांमध्ये तत्वज्ञान मांडलेले आहे.

प्रवाहन जैवली ने श्वेतकेतूला देवयान व पित्रूयान ह्या दोन मार्गांचा उपदेश केला. (शिकविले) देवयान हा यज्ञकर्माने प्राप्त होत नाही तर तो आत्मज्ञानाने प्राप्त होतो. त्याला शिकवताना तो म्हणतो की हे देवयानाचे तत्वज्ञान तुझ्या पूर्वी बाह्मणांपाशी नव्हते तर ते क्षत्रियांपाशी होते, म्हणून ह्या जगात क्षत्रियांचेच प्रशासन निर्माण झाले, ब्राह्मणांचे नाही !! ( छांदोग्य उपनिषद ५/३, बृहदारण्यक ६/२).

आता आपण थोडी तुलना पाहू. भारतीय संस्कृतीच्या समकालिन ग्रीस संस्कृती मध्ये पण तत्वज्ञान आकार घेत होते पण तत्वचिंतनाचा क्षेत्रात ग्रीक स्त्रीने प्रवेश केला नव्हता. प्लेटो किंवा इतर तत्ववेक्त्यांसोबत एकही स्त्री चर्चा करतानाचा लिखीत पुरावा नाही ! इतकेच काय अतिप्राचिन ग्रीस इतिहासात कुठेही स्त्री पुरूषांसोबत येऊन कुठेही तात्विक वाद देखील घालत असल्याचे ग्रीक मायथॉलॉजी मध्ये नाही, ज्या ऑरॅकल वगैरे स्त्रिया आहेत त्या फक्त क्वचित समयी उपदेश द्यायचा.

तात्पर्य : भारतीयांचे जुन्या काळी जीवन बौद्धिक संस्कृतीच्या निकोप वाढीस कारण झाले होते. स्त्री व पुरूष किंवा उच्च वर्ण व निच्च असा भेदभाव नव्हता. नाहितर आज जे वेदज्ञान म्हणून आहे ते नसले असते.

फक्त गंमत अशी आहे ही जनमाणसांत कोणी एकाने विरुद्ध मत मांडले की लवकर पसरते. म्हणून मग शुद्र आधिपासून शुद्र अन बाह्मण आधिपासून वरचढ असे मांडले गेले. पण हे मांडताना व तो विचार इतरत्र पसरवताना आपण जर थोडीही जबाबदारी घेत नाही की ते सत्य असेल काय? वरिल दोन पाच उदा, आत्ता वेळ होता म्हणून लिहून काढली. ती पण वेद विद्येत काहीच माहिती नसनार्‍या माझ्यासारख्या अज्ञाने, त्यावरुन तरी मला कुठे एकच वर्ण वरचढ, अन तोच वेदाभ्यास करु शकतो असे दिसत नाही.

अर्थात त्यानंतर काळात वैचारिक बदल तर झालेच पण इतर आक्रमनांमुळे संस्कॄतीचे मिश्रन तयार झाले, ह्या मिश्रनात नेहमीसारखेच काही ज्ञाती पुढे गेल्या तर काही मागी पडल्या. तिथून आपल्या समाजात गोंधळ सुरु झाला तो आजपर्यंत. त्यावर यथावकाश मांडायचा प्रयत्न मी करणार आहेच.

निदान इथून पुढे तरी वेदकालापासून क्षत्रिय, शुद्र व वैश्यांवर बाह्मणाने अत्याचार केले हे म्हणने सोडून द्याल ही प्रामाणिक अपेक्षा.

केदार | 19 June, 2010 - 10:01
मुळात धर्म म्हणके काय त्याची व्याख्या स्पष्ट करू या का? >>> आश्चर्य वाटेल संस्कृत मध्ये रिलीजनला पर्यायी शब्द नाही !! (झक्की वा इतर संस्कृत पंडित - माझे चुकीचे असेल तर ह्यावर उजेड टाका)

धर्म हा शब्द रिलीजनला पर्याय म्हणून लोक म्हणतात, पण धर्म हा शब्द हिंदू संस्कॄती मध्ये अनेक अर्थानी वापरला गेला, उदा कृष्ण अर्जूनाला कौरवांना मारणे हा तुझा धर्म आहे असे म्हणतो, किंवा माझ्या वडिलांची मी त्यांचा म्हातारपणी काळजी घेणे हा माझा पुत्रधर्म आहे. त्यामुळे धर्म हा शब्द भारतीय वैदिक संस्कृती मध्ये रिलिजन ह्या अर्थाने वापरला गेला नाही. मी माझ्या रंगीबेरंगीवर काही महिन्यांपूर्वी ह्यावर थोडा उहापोह केला होता.

त्यामुळे हिंदू जीवन पद्धत म्हणने योग्य झाले असते, पण इतर सर्व धर्मात (इथे रिलीजन) त्याचा अर्थ वेगळा होईल म्हणून सामान्यपणे आपण हिंदू धर्म म्हणतो, जे चुकीचे आहे.

दलिताना शंकराचार्य म्हणुन नेमावे. >> जरुर का नाही, जर तेवढी योग्यत्या त्या व्यक्तीत असेल तर का नाही? बाकी मधुकरराव माझे नाव जोशी आहे अन मी जातीने ब्राह्मण आहे म्हणून मी शंकराचार्य होऊ शकतो असे मला वाटत नाही, दलित पंतप्रधान नेमन्याइतके हे नक्कीच सोपे नाही. तेवढी योग्यता अगदी तुम्ही स्वतः मध्ये पण आणू शकता. सावरगाव, बार्शी इथे वेदशाळा आहे, तिथे वेदप्रविण होण्यासाठी आधी १२ वर्षे अभ्यास करावा लागतो, मग त्यानंतर तुम्ही त्यावर टिका (इथे टिकेचा अर्थ वेगळा आहे) लिहून योग्यता सिद्ध केली की आचार्य म्हणून कोणाचिही गणती होऊ शकते. त्या पुढची पायरी अश्या अनेक आचार्यांत आपले वेगळेपण सिद्ध करणे हे होय. हा झाला एक मार्ग. दुसरा मार्ग स्व अभ्यास, जसा मी पण कधी कधी करतो तसा. ह्यात वेळ लागतो, पण कोणतही कॅलीबर असेल तर का नाही?
जिथे डायसन सारखा ईंग्रजी माणूस वेदपंडित होतो तिथे तुम्ही वा इतर कोणी दलित न व्हायला का झालं?

(पण मला स्वतःला ही अशी मागणी हास्यास्पद वाटते, शंकराचार्य होणे हे लक्ष्य ठेवण्यापेक्षा माझ्यासारखा जोशी वैयक्तिक जीवनामध्ये जातपात न माणन्याचे लक्ष ठेवतो ! दलित शंकराचार्य झाल्यामुळे उद्या दलितांकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलेल हे मला वाटत नाही. )

अशा प्रकारची घाऊक विधाने करणे चूकच. मुळात मी एखाद्या जातीचा द्वेष करतो असे मला तरी वाटत नाही >> हे घाऊक उदाहरण नाही. सत्य आहे. उदाहरण काल्पनिक पातळीवर पण करता येते, पण मी तसे केले नाहीत. आपण हवे असल्यास माझ्याकडिल उपनिषिदे वाचावित. त्यातून तुम्हाला अशी अनेक सत्य उदाहरणे मिळतील. मी उगीच इथे बडबड करत नाही !!

आणि जातिय द्वेष तुम्ही नक्कीच करत नाहीत, पण येथील इतर विद्वजन करतात. ते पोस्ट तुम्ही प्रश्न विचारला म्हणून लिहले, पण उत्तर फक्त तुमच्या साठीच नाही तर सर्वांसाठीच लिहले आहे. उदाहरण देण्याचे कारणच हे होते की नुस्ता ब्राह्मण / हिंदू द्वेष करुन काहीच साध्य होणार नाही.

नुतन सामाजीक (अर्थ)व्यवस्थेत प्रत्येक काळात, प्रत्येक देशात एक समाज पिडित राहतो, त्याशिवाय ही व्यवस्थाच चालत नाही. आणि मी परकिय आक्रमनांमुळेच हे सर्व बदलले, त्या आधी आलबेल होते हे म्हणालेलो नाही. त्याआधी बदलाव झाले आहेत. क्षत्रियांचे स्थान कमी होऊन ब्राह्मण हळूहळू वरचढ झाले आहेत हे मी अजून नाकारले नाही.

केदार | 19 June, 2010 - 10:49
हिंदु धर्म म्हटलं तर ती शुद्ध बामण फिलॉसॉफी होय. >> अहो वरच प्रुव्ह केले की ती फिलॉसॉफी सर्व वर्णांनी मांडलेली आहे. कुण्या एकाने नाही. असो

हिंदू धर्मात व हिंदुत्वात चांगले जे काय आहे ते सध्याच्या काळाच्या अनुषंगाने सांगा.... सध्या त्यातील किती विचार प्रत्यक्ष येत आहेत ते सांगा... त्यासाठी कोण व किती प्रमाणात कार्यरत आहे, त्याची व्याप्ती काय आहे.... हे देखील हिंदुत्वातील चांगले काय आहे हे दाखवण्याचाच एक भाग होईल

>> असे प्रमाण कसे काढणार हे सांगू शकतेस का? नाही ना? आणि हे बघ सध्याच्या राजकीय जीवनात तर सर्व जातीनिहाय चालते. एकीकडे म्हणायचे तुमची एकगठ्ठा मते माझी, दुसरीकडे म्हणायचे हिंदूधर्मात जाती आहे. असे दुतोंडी धोरण असल्यावर हे कसे बदलेल? शक्यच नाही. आज नाही अजून हजार वर्षे नाही. हिंदू धर्मात चांगले काहिच नाही असे म्हणने अशी आजची काळाची गरज आहे, तसे म्हणले नाही तर दुर्दैवाने पोलिटिकल करियर नष्ट होते, व ते अनटचेबल होतात ह्याकडे दुर्लक्ष करुन कसे चालेल. मग अश्या धर्मासाठी कोण कश्यासाठी कार्यरत राहिल??

मग दोन चार फुटकळ लोक येऊन हिंदू धर्म पार्टी काढतात, श्रीराम सेना तयार होते व त्यांचा "हिंदू म्हणजे काय" ह्या मता प्रमाणे त्या पार्ट्या चालवतात व हा दुरावा वाढतच जातो. व्होटबँक राजकारण आजच्या जातीय गोंधळाला जास्त कारणीभूत आहे. मुळ हिंदू धर्म नाही.हा दुरावा टिकवून ठेवावा ही सर्व पार्ट्यांची राजकीय गरज आहे. हे कोणाच्या लक्षात येत नाही. मग चांगल्या गोष्टी बाजूला पडतात. ऑफकोर्स आजच्या हिंदू धर्मात १० चांगल्या गोष्टी असल्या तर २० वाईट आहेतच. पण त्या कुठल्या धर्मात नाहीत?

खरे तर धर्म ही वैयक्तीक बाब आहे, आणि आपला (आयमीन हिंदू धर्मीयांचा) धर्म तर विशेष आहे, ज्यात हजारो जाती एकत्र जगतात, मग अश्या धर्माला राजकीय बांधनीसाठी वेठीवर धरल्यावर तुकड्यांशिवाय अजून दुसरे काय निष्पन्न होणार? आणि दुर्दैवाने त्याचे श्रेय काँग्रेसला जाते. भाजपा/ संघ तेंव्हा निर्माणही झाले नव्हते अन जातीनिहाय राजकारण सुरु झाले होते. असो.


केदार | 19 June, 2010 - 11:57
म्हणजे जी व्यक्ती शंकराचार्य बनते ती मुळातच ब्राह्मण नसते >> नंदिनी अगदी उलट. जी व्यक्ती शंकराचार्य असते ती ब्राह्मण असते. ब्राह्मण हा शब्द आजकाल जातिवाचक झाला आहे, पण तो जातीवाचक नाही. त्या शब्दाचा अर्थ - ज्याला ज्ञान प्राप्त होते तो. ज्ञानी.

माझ्या माहिती प्रमाणे सगळेच शंकराचार्य बामण होते व आहेत >>> अहो तुम्हीच काय वेद फक्त बामनांनाच माहित अन त्यांनीच तयार केले. हे खुद्द बामन अन इतर जात वाले म्हणत होते अन तसाच अज्ञ समज सर्व हिंदूत होता. तसा समज तुमचा झाला तर त्यात काय गैर.

आपण थोडे डिटेल पाहू. (हरकत नसेल तर)

बुद्ध जन्माचा काली भारतीय संस्कृतीत विविध विचारांचे आंदोलन निर्माण झाले होते. वैदिक ब्राह्मण व क्षत्रिय ह्या मध्ये विचारांची मोठी चळवळ झाली, तेंव्हा अनेक नास्तिक मतेही जन्माला आली. ही चळवळ तुम्ही बौद्ध संप्रदायाचा त्रिपिटक बुद्धचरितात वाचू शकता. (वाचाल अशी आशा). भगवान बुद्ध, ज्ञानप्राप्ती आधी जेंव्हा फिरत होते तेंव्हा त्यांना वैदिकातील ६२ तत्वसंप्रदाय भेटले होते, त्यांचांशी बुद्धांची चर्चा झालेली आहे. ( ब्रह्मजालसुत वाचा) पुनर्जन्म / आत्मा आहे की नाही पापपुण्य म्हणजे काय अश्या ह्या चर्चा होत. वैदिक धर्म तेंव्हा ज्ञानप्राप्तीबरोबरच कर्मकांडाकडे झुकला होता. म्हणजे वैदिक धर्मात अनागोंदी माजन्यास सुरुवात झाली होती. बुद्धाने नास्तिक / आस्तिकांसोबत चर्चा केल्या, वाद घातले ( पुरावा दीघ निकायातील तैविज्ज सुत्त १३ ). उरुवेला इथे जेंव्हा बुद्धास ज्ञानप्राप्ती झाली तेंव्हा तत्कालिन प्रसिद्ध ब्राह्मण कश्यप ह्यासोबत बुद्धाचे बोलने झाले व कश्यपाला बुद्धमते पटल्यामुळे तो ब्राह्मण बौद्ध झाला. अचानक कश्यप बुद्ध झाला ते पाहून त्याला माणनारा प्रबल मगधाचा राजा बिंबीसार बुद्ध झाला.
हा वाद महावग्गात सापडतो. तसेच तेथे नोंद घेण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे बुद्धावाचून बुद्धाचा विचारसरणीस पोचलेले अनेक ज्ञानी लोक बुद्धाचाच प्रांतात होते व आत्मज्ञान त्यांना प्राप्त झाले होते. ( महावग्ग) (कृपया हे लक्षात घ्या हे मी जे मांडतोय त्याला पुरावे आहेत. ह्या शेंड्या नाहीत. )


हा बौद्ध धर्माचा वैदिकांवर विजय. .. येथून पुढे बौद्ध धर्म वाढीस लागू लागला, तर अनेक मार्गदर्शक ब्राह्मण जसे वरिल कश्यप व इतरेज ज्यांनी अचानक वैदिक धर्म सोडला वर बौद्ध झाले, त्यामुळे वैदिक धर्मियत हाहाकार माजला, व बौद्धिक अनागोंदी निर्माण होण्यास सुरु झाली.

शंकराचार्य जेंव्हा अस्तित्वात आले तेंव्हा वैदिक धर्म लयाला जात होता, त्यांनी वैदिक धर्माला परत उच्च दिवस प्राप्त करुन दिले. बौद्ध धर्माचा प्रकांड पडिंताबरोबर (मंडनमिश्र) चर्चा झाली, ज्यात ते विजयी झाले. हा काळ होता ज्ञाती निहाय समाज रचनेचा. शंकराचार्यांनंतर मनू आला व त्याने ( हे दोन किंवा जास्त मनू आहेत असे आता इतिहासाचार्य मांडत आहेत. पण तुम्हाला काय झोडले की झाले ) ही व्यवस्था कायम करण्यास हातभार लावला. बौद्धकालात (पर्यायाने शंकराचार्यांचाकाळात) बामन असने हे आजच्या दलित असन्याचा बरोबरीचे होते. वैदिक धर्म शंकराचार्यांचा कालात नामशेष झाला असता असे अनेक इतिहासकार मांडतात. वैदिक धर्म आपली प्रतिष्ठा गमावून बसला व बौद्ध धर्म तत्कालिन जगात पसरायला सुरु झाली होता. अश्याकाळात शंकराचार्यांनी धर्म जोडायला काही नियम केले, जसे हे धर्मगुरु पद निर्मान करुन त्या पदास प्राप्त करण्यास लागणारे आचार विचार, शिक्षा इ इ. मुळ वैदिक धर्माचा पाया उसवल्या कारणाने व बहुसंख्य लोक बौद्ध झाल्याने जे उरलेले लोकं होते त्यांनी त्यांचापुरतेच शिक्षण मर्यादित केले. बरं त्यातही मेख अशी की संहिता ह्या प्रत्येक वेदाचा वेगळ्या, त्यांना म्हणायची पद्धत वेगळी इ इ. साहजिकच कमी लोकं उरल्यामुळे ज्ञान संपादनाची व वर्धनाची अहमहमिका लागली व तिच पद्धत कालौघात कायम झाली. आता थोडे हटके उदा बघा, मायबोलीवर आपण सर्व मराठी लिहतो, पण व्याकरण प्रमाण मराठी हातावर मोजणारे लोकं लिहीतात, तसेच काहीसे बामनांने झाले. व ते सर्व बळकावून बसले, कारण मग वेद अपौरुषेय आहेत असे सांगता आले, व क्षत्रिय रांजाघरी गुरु होता आले. म्हणजेच स्वतःला वाचविन्यासाठी व अल्पसंख्याकांतू बहुसंख्य होण्यासाठी ही चाल बामनांनी खेळली असे म्हणा. तर्कतिर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व वि का राजवाड्यांनी वैदिक / बौद्ध संघर्षावर लिहले आहे. इच्छुकांचा ते कामी येईल.

आता शंकराचार्य पद का निर्माण झाले व त्याकाळाची काय गरज होती ते आपल्या लक्षात आले असेल.

पुढचा भाग लिहला तर त्यात परत एकदा वैदिक धर्म बौद्ध धर्माला कसा पुरून उरला (वैचारिक मतांतरांमुळे, हो नाहीतर तुम्ही भलतचं घ्याल) व ह्या मॉरल विजयानंतर कन्वर्ट वैदिकांनी प्रगतीची दारे कशी बंद करुन घेतली ते लिहेल. एक लक्षात घ्या तत्कालिन वैदिक / बौद्ध / जैन हे कधीही आपला धर्म बदलू शकत असत. राजेच्या राजे वैदिकातून आधि बौद्धधर्माकडे गेले अन परत वैदिक धर्मिय झाले ह्याचे य पुरावे तुम्हाला भारतीय इतिहासात मिळतील.

आता हे बघा, दलित पंतप्रधान, मुख्यमंत्री, दलित शंकराचार्य जसे आज तुम्ही करा म्हणत आहेत तिच भुमिका तत्कालिन वैदिकांनी घेतली असू शकते की नाही? प्रगतीच्या टप्यावर असलेला एक समाज दुसर्‍याला नेहमीच पायदळी तुडवतो. मग तो वैदिक असो की बौद्ध. ह्यावर अधिक लिहता आले असते पण पोस्ट मोठ्या होत चालल्या आहेत. पण हिस्ट्री रिपीटस.

आणि मधुकरराव बामन जातीवर चर्चा होणार असेल तर मी थांबलेले बरे. तेवढा वेळ नाही अन एनर्जी तर बिलकूल नाही.

माझी हिंदू ह्या शब्दाची व्याखा - मी सावरकर व्याखेला प्रमाण माणतो.

आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥

हीच व्याख्या का?

ही व्याख्या सर्वसमावेशक आहे. मग तू मुसलमान असो, वा ख्रिश्चन वा हिंदू तू हिंदूस्थानी. का? तर गंमत अशी आहे की हिंदू धर्मात तुम्ही कोणाला पुजावे हा तुमचा प्रश्न कारण हिंदू जीवन पद्धत. खुद्द हिंदू मध्ये अनेक पंथ आहेत, जे एकमेकांच्या विरुद्ध तत्वज्ञान पुजतात व तरीही स्वतःला हिंदू म्हणूवून धेतात. दुसरा मुद्दा असा की रुढार्थाने जेंव्हा इतर देशातील आक्रमने झाली तेंव्हा त्यांनी "हिंदूस्थाना" वर आक्रमन केलं, त्यात वसणार्‍या हिंदू वा मुस्लीम राजांवर नाही, कित्येक आक्रमनं ही मुगल सम्राटावर पण झाली आहे, (ऑफकोर्स त्याला वाचवायला इराणचा सम्राट ओलेतं सोडून पळत यायचा ती गोष्ट निराळी! ) पण त्यातील कागदपत्र पाहता हिंदूस्थानवर चढाई असेच शब्द आहेत. (अभ्यासा - दिल्ली इतिहासातील इराणी व तुर्क संघर्ष - इथे दोन पक्ष होते व ते एकमेकांवर कुरघोडी करत, अश्याच एका पक्षाचा वापर करुन मराठे दिल्लीपती झाले होते - तो भाग निराळा - इथे ते नको, पण इतिहास विसरु नका. )

मागे कुठे तरी वाचले होते की कोण ह्या देशाला हिंदूस्थान म्हणत? त्याच उत्तर कागदपत्रातून मिळेल. अगेन - जर अभ्यास केला असता तर असे प्रश्न पडले नसते. २६/११ नंतर पाक टेलिव्हिजन वर तो अतिरेकी "हिंदूस्थानी" आहे, त्याचा चेहरा, मुखवटा, बॉडी टाईप हिंदूस्थानी आहे पाकीस्थानी नाही असा प्रचार आपण पाहिला असेलच.. ( नसला तर यु ट्यूबचा आधार घ्या) तर थोडक्यात आपणासर्वांना हिंदू म्हणून आपले दुश्मन सुद्धा पाहतात ! तसेच हिंदूस्थानी मुस्लीम ही सज्ञा नेहमी वापरतात.
म्हणून

आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥

आता हिंदुत्व म्हणजे काय? हिंदूधर्मापासून ते अलग काढता येईल का? सर्वच हिंदूस्थानी हिंदूत्व बाळगतात काय?

हिंदुत्व ही थोडी वेगळी कल्पना आहे. त्यात काही मुलभूत गोष्टी थोड्यावेगळ्या आहेत. जसे

१. हिंदुत्व म्हणजे कुठल्ह्याही धर्माचे पालन केले तरी चालेल, नास्तिक असाल तरी उत्तम, कोणाची पुजा करता ह्याला दुय्यम स्थान आहे. थोडक्या सर्वधर्मसमभाव ( म्हणजे आजच्या मराठीत सेक्युलर !! )
२. हिंदुत्ववादी म्हणजे ज्यांना मुळसंस्कृतीवर विश्वास आहे व ती परत आणून सध्या भारतीय समाजात असलेली मरगळ / अनागोंदी दुर करु इच्छितात.
३,मुळसंस्कॄती म्हणजेच -
अ. समाजात कुठल्याही जाती धर्मालाचा सारखे स्थान मिळावे.
ब. स्त्रिया व पुरूष ह्यांचे स्थान सारखे असावे.
क. समाजातील सर्व स्थर हे समान असावेत.
४. हिंदूराष्ट कल्पना - भारत देशाला त्याचे उच्च स्थान प्राप्त करुण देणे ह्यासाठी हिंदू तत्वज्ञानाचा आधार घेणे, तलवारीचा नाही ! (परत हिंदू तत्वज्ञान म्हणजे मुदा क्रं १ - सर्वधर्मसमभाव, कुणी कुठलाही धर्म अंगिकारावा हा ज्याचा त्याचा प्रश्न. हे अधोरेखित करायची गरज भासू नये)
५. अहिंसावादी पण स्वराष्ट्राचा बचावासाठी शस्त्र उचलणारा.

हिंदुत्व समजुन घेण्यासाठी आपली पुराणी संस्कृती समजून घेणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच मुळ वैदिक संस्कृती मधील वर्णाचे व स्त्रीयांचे स्थान मी मांडत होतो. आणि माझ्यासहित अनेकांचा हिंदुत्ववाद म्हणजे तसा समाज पुनःप्रस्थापीत करणे हा होय. हिंदुत्ववाद म्हणजे ब्राह्मण वरचढ व शुद्र दलित असा नाही!! हा प्रचार स्युडो सेक्युलर करत फिरतात, ज्यांना आपली मुळ संस्कृतीच माहिती नाही !!

आजचे काही विचारवंत देशात एकात्मता आणू पाहतात, जातीधर्म नष्ट करु पाहतात, दलितांना समानसंधी देऊ पाहतात. माझ्या दृष्टीने ती सर्व लोक हिंदुत्ववादी.

सर्वच हिंदूस्थानी हिंदूत्व बाळगतात काय?
नाही. इतकेच काय सर्व हिंदुत्ववादी संघटनाही खर्‍या हिंदुत्ववादी नाहीत असे खेदाने म्हणावेसे वाटते.
हिंदुत्ववादी नाव घेतले म्हणजे सर्वच सावरकर होत नाहीत. अश्या काही संस्था / संघटनांनी हिंदुत्ववादी नावाला समाजात अनटचेबल करुन ठेवले आहे, ज्याचा त्रास आमच्यासारख्यांना होतो.


त्याशिवाय आणखी काही मुद्द्यांवर मी प्रकाश टाकू इच्छितो.

१. हिंदुत्वाचे मुख्य गूहीतक तुम्ही विसरला. सर्व नागरीक समान. थोडक्यात कोणी मुस्लीम आहे म्हणून त्याला त्याचा कायदा लागू होणे इथे शक्य नाही !!
२. तुमचा धर्म कोणताही असला तरी तुम्ही इतर धर्मियांना समान स्थान देणार, म्हणजे धर्मांतर स्वेच्छेने करता येईल, पण कोणताही धर्म वाढविणार्‍या संस्थांवर बंदी घालने क्रमप्राप्त. म्हणजे मिशनरी वर्क बंद !

३. मुख्य म्हणजे हिंदू धर्म बौद्धिक विजयावर लक्ष केंद्रीत करतो ह्याचा अर्थ असा नाही की कोणीही उठावे अन धर्मांतर करुन घ्यावे. आम्ही धर्म वाढविन्यास मिशनरी संस्था वा काफिरांना कापण्यास जिहादी काम करत नाही तरी असे काम होण्यापासून रोखने मात्र करणार. नाहीतर उद्या भारतात हिंदुत्वाला माणनारे लोक कमी होऊन ख्रिश्चन अन मुसलमान जास्त होणार. व ते आमच्या हिंदुत्वाची शिकवन मोडीत काढून काफिर म्हणून आम्हालाच कापणार. हिंदुत्व म्हणजे धर्मांतर मान्य करुन घेणे नाही !!

४. हिंदू धर्म सर्वांना सारखे मानतो. कोणी काफिर आहे म्हणून हिंदू धर्मात मरत नाही तसे कोणी ख्रिश्नन आहे म्हणून तो येशूपुत्र होत नाही, मारामारीची ही शिकवन ह्या धर्मात नसल्यामुळे तो धर्म ( शिकवन) मानवतेसाठी चांगला आहे असे आमचे म्हणने आहे. लोकशाही मध्ये संख्येचे महत्व चिन्याने सांगीतले आहे.

हे मान्य नसेल तर चर्चा व्यर्थच आहे. एकूनच ही चर्चा चालू होण्या आधी जो व्हियू होता तसाच व्हियू अनेक शंकाचे निरसन करुनही आहे असे दिसतेय.

आर्य इथे येण्यापुर्वी इथे एक संस्कृती नांदत होती. तिचे काय ? >>>

१.एकतर आर्यन इन्वेजन थेअरी खरी आहे की नाही ह्यातच घोळ आहे. बरं वादासाठी ते खरे आहे असे मानून चालू.
२. ती खरी असली तर त्या संस्कृतील देव (उदा गणपती, नाग, हनुमान) हे आर्य संस्कृती मध्ये मिसळून गेले आहेत. वैदिक आर्य अन अनार्य ह्यांना पुजतात. बूहणस्पती चे अचानक गणपती कसे झाले हे मी २००८ कि २००९ च्या मायबोली गणेशोत्सवाच्या लेखमालेत शैलजाने लिहलेल्या लेखाला प्रतिक्रिया म्हणून मांडले होते. ते इथे परत मांडत नाही. गणपती स्थापना मंत्र ॐ गणांना त्वां गणपती ह्या मंत्रा (खरेतर सुक्ता) वरची माझी प्रतिक्रिया पाहावी.
३. असे माणले जाते की शंकर हा आर्य देव नाही. म्हणजे सर्व सुक्तांमध्ये इंद्र, वरुण, मित्र ह्यांचीच पुजा व वर्णन आहे, पण शंकराचे नाही. भारतात शंकराला माणनारा शैव पंथ हिंदूधर्मातच आहे. व ह्या पंथाचे आजचे स्थान मी कोणाला सांगावे ह्याची गरज नाही.
४. दोन्ही संस्कृतीचा संकर होउन मगच ही वैदिक संस्कृती तयार झाली. म्हणून शंकरवाले मुळ हिंदू (अनार्य) अन अग्निचयन करणारे आर्य अशी फोड आता करता येणे अशक्य आहे.

आपल्या ह्या आर्य / अनार्य शंकेचे निरसन झाले असे गृहीत धरतो.

आस्तिक आणि नास्तिक बद्दल --
आस्तिक म्हणजे वेदप्रमाण आहे असे माणणारा जनसमुदाय. - उदा हिंदू मधील काही संप्रदाय
नास्तिक म्हणजे वेदप्रमाण मान्य नाहीत असे ते - उदा बौद्ध, जैन
पण ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ आता लोक देव माणनारे आणि न माणनारे असा काढतात. त्या अर्थाने पण हिंदूंमध्ये देव मानला नाही तरी चालते.

गंमत अशी आहे की आपली शिकवन ही धर्माचा प्रसार व प्रचार करण्यात न घालत स्वतःला आत्मज्ञान प्राप्त करुन घ्या असे हिंदू धर्म सांगतो व इतर दोन्ही धर्म नेमके उलट सांगतात. त्यामुळ व्याखेप्रमाणे जरी राहनारे मुस्लीम हिंदूस्थानी असतील तरी हिंदुत्ववादी नसतील. अन्यथा वंदेमातरमावर बंदी घालावी ह्याचे प्रयोजन काय? किंवा एकाच देशात नागरिकांना वेगवेगळे कायदे असावेत ह्याचा उद्देश काय?

एकीकडे असा फरक तुम्हासारख्यांना (वैयक्तिक नाही, एकुणात लिहत आहे) चालतो पण हिंदुत्वाचा व्यापक उद्देश आहे तो नाही चालणार ह्यातच सर्व आले. म्हणूनच स्युडो सेक्युलर हा शब्द मी योजतो. कारण खरा सेक्युलरिझम ह्या हिंदुत्वात आहे. आता हिंदू धर्म व हिंदूत्व हे दोन्ही वेगवेगळे आहेत व हिंदुत्वाचा व्यापक अर्थ पटला नसला तरी कळाला असे म्हणावे काय?

बरोबर चिन्या. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व.

डिफेन्स रेस्ट्स द केस.

हे हिंदुत्व माझ्या मते तुम्हा विरोधकांचा विचारासारखे आहे असे म्हणावे काय?

योग यांच्या व्याख्येप्रमाणे सावरकर हिंदु नाहीत, >> म्हणजे काय? आणि कसे ते व्यवस्थित मांडाल काय? योगने देखील सावरकरांची व्याख्या दिलेली आहे. आणि योग व्याख्या किंवा केदार व्याख्या असे काही नाही, प्लिज फाटे फोडू नका. मी माझ्या पोस्ट मध्ये मी सावरकर व्याख्या प्रमाण मानतो असे लिहले आहे की?

म्हणजे सावरकरी व्याख्येनुसार स्वतः सावरकरच हिंदू नाहीत?? प्लिज ..

केदार | 21 June, 2010 - 01:31
केवळ मी त्या धर्माच्या आईवडीलांच्या पोटी जन्माला आलो म्हणून तो धर्म मला चिटकला, त्यातल्या बऱ्याचश्या चालीरीती मी पाळत नाही, तर मी मला त्या धर्माचे लेबल का लाऊन घेऊ >>

मी हिंदू धर्माबद्दल अधिकारी वगैरे नाही पण ऊत्तर देतो.
चालीरिती पाळने न पाळने ह्यावरुन धर्मबहिष्कृत हिंदूमध्ये होत नाही वा तुम्ही हिंदू आहात की नाही हे ही ठरत नाही. तुमच्या विचाराची अनेक हजारो माणसे आहेत व हा प्रश्न पडने अतिशय योग्य आहे. ह्यावर गांधीजींचे उत्तर तुम्हाला देतो.

गांधीजींना एका मिशनर्‍याने गाठले व तो त्यांचा जवळचा मित्र झाला. वेजीटेरियन सोसायटी मध्ये यायचा जायचा इ इ. मग त्याने गांधींना ख्रिश्चन होण्याची गळ घातली, बर्‍याच प्रयत्नांनंतर गांधीजी त्याला म्हणाले, मित्रा माझा धर्मच मला माहित नाही, तोच पचवने ह्या जन्मात अश्यक आहे तर मी परत ख्रिश्चन का होऊ? आधी मला माझा धर्म माहित करुन घेऊ दे.

मला वाटतं बंहुसंख्य हिंदूंना मंगळसुत्र घालने, जोडवी घालने, दिवाळीत लक्ष्मीपुजन करने, द्सरा दिवाळी साजरी करने, काही चालीरिती पाळने म्हणजे हिंदू धर्म वाटतो. ही त्या व्यक्तींची चूक आहे.
अहो साधी गाडी चालविताना आपण आजूबाजुला बघतो, मग इथे तर पूर्ण जीवन व्यतीत करायचे आहे. त्या व्यक्तींनी अ‍ॅक्सीडेंटली का होईना ज्या धर्मात जन्मलो तो थोडा माहिती करुन घ्यावा. ( हे सर्वच धर्मांना अन व्यक्तींना तितकेच लागू), त्यातूनच पुनरनिर्मिती होते अन आदि शंकराचार्य विवेकानंद, बौद्ध, महावीर जन्मतात. अन्यथा मरगळ आहेच.
वरिल पोस्ट हिंदुत्वाविषयी नसून एकुनच उदासिनतेबद्दल आहे.


हिंदुत्वाची गाडी वारंवार मुस्लीमावर का जातेय >> कधी गेली. धर्म म्हणला की तुलना होणारच ! जसे हिंदुधर्मात जातीभेद बोकाळला आहे, उच्चवर्णियांनी फायदा घेउन अत्याचार केले हे मान्य करायला मला अवघड जात नाही तसे हिंदुत्व म्हणले सर्व समान, काँग्रेस मुस्लिमांन एक न्याय, हिंदूंना दुसरा न्याय हिंदूंमधील जातींमध्ये पण निवडणूकात जातीय राजकारण करते हे तुम्हाला मान्य का होऊ नये. काँग्रेस सत्तावादी आहे हिंदुत्ववादी नाही !

एखाद्या हिन्दुने पैशासाठी गुपिते पाकला विकली तरीही तो राष्ट्रिय? एखाद्या अहिंदुने देशासाठी प्राण दिले तरीही तो अराष्ट्रिय >>> परत एकदा तेच. अहो वर मांडले आहे की. हिंदूधर्म आणि हिंदुत्व ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हिंदू असने म्हणजे हिंदूत्ववादी असेलच असे नाही. तुमचेच उदाहरण घ्या. तुम्ही हिंदू आहात पण हिंदुत्ववादी थोडी आहात?

मला तुम्हा विरोधी लोकांच एक कळत नाही की तुमची भुमीका नेमकी काय आहे? हिंदुत्व सांगीतल तर म्हणता काँग्रेस खरी हिंदुत्ववादी. आणि मुस्लीम लांगुलचालन, जातिय राजकारण मांडले की पोस्टला इग्नोर, वंदेमातरम, जन्मभू असे मांडले की मुस्लीम धर्मात फक्त अल्ला महान म्हणून पुळका येऊन छाती फोडून वाद घालने पण हिंदुत्वाचा अर्थ समजावून सांगीतल्यावर इग्नोर करने आणि येथील हिंदुत्व मांडणार्‍या लोकांच्या पोस्टीतून एक दोन ओळी घेऊन त्यावर परत चर्चा घडवून आणायची पण स्वतची भूमिका कधीच मांडायची नाही.

तेच ते मुद्दे नका हो मांडू. वादामधली गम्मत जाते.

एखाद्याने दाढीवाल्यांची संघटना काढून दाढीत्व हेच राष्ट्रियत्व असे म्हणावे किंवा दुसर्‍याने देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हणत्व म्हनजेच राष्ट्रियत्व असे म्हनावे तितकेच चुकिचे आहे हे >>

दाढित्वच्या व्याखेत मी हिंदुत्वाच्या व्याखेत नमुद केलेले सर्व मुद्दे येत असतील तर तुम्ही दाढित्व संघटणा काढा मी कार्यवाह व्ह्यायला तयार आहे. अहो हेटाळनी करताना तुम्ही हिंदुत्वाची व्याख्या तर पाहा. त्यातल्या चुका काढा. एक चांगला राष्ट्रप्रेमी समाज दाढीवाली संघटना किंवा टकलू संघटना करायला तयार असेल तर वाढवू आम्ही दाढी अन करु टक्कल. ( हो ते टक्कलाला तुमचा विरोध असण्याची शक्यता जास्त आहे कारण टक्कम बामनं करतात, दाढी बरी, मुस्लीम ना मग सर्वधर्मसमभाव त्यातून मस्त पैकी दिसतो. )

हिंदूत्व शब्दात हिंदू शब्द आहे म्हणून तुम्हाला व अनेकांना त्रास. बाकी काही नाही.
काँग्रेसने / लालझेंडावाल्यांनी हिंदुत्वाच्या व्याखे प्रमाणे तसे करावे, मी काँग्रेसला / त्यांना मत देईन, मला काही प्रॉब्लेन नाही बरं.

जरी त्यातून फार मोठी फिलॉसॉफी व्यक्त होताना दिसते व टाळ्या घेण्यासाठी हे वाक्य कामी येऊ शकते पण हे आणि असे वाक्य काहीच कामाचे नसतात. बेसिक गरजा भागतात. आणि त्यानंतर लगेच दुसरी गरज महत्वाची ठरते.

गणूशेट, आम्हाला मॅस्लो'ज थेअरी ऑफ निडस नावाची एक थेअरी अर्थशास्त्र शिकताना होती. त्यात एक डायग्राम दिसेल. त्यातली खालून दुसरी, तिसरी व सर्वात वरची म्हणजे पाचवी ह्या गरजेत धर्म येतो. ( जितके खाली जाल तितकी बेसीक गरज व ती गरज पूर्ण झाल्यावर लगेच माणूस त्यावरच्या पायरीकडे आपोआप वळतो.



इंटरनेटवर सर्च मारा. फार ह्या गरजा का लागतात ते ही कळेल. थोडक्यात डायल अप कनेक्शन पण आहे, पण ब्रॉडबॅन्ड ची मजा वेगळी. नोकियाचा ३३१० पण चालतोच, पण आयफोन असावा वाटतोच. तशीच धर्म ही पण सामान्य माणसाची गरज आहे.

ही टिपन्नी घेऊन वाद नका सुरु करु, मुळ विषय अजूनही हिंदुत्व हा आहे. फक्त नेहमी असे वाक्य लोक फेकतात, आज उत्तर द्यावे वाटले.