Friday, August 24, 2007

पुष्पावतीचे खोरे....



मी (सचिन), सुभाष, मिहीर आणी भक्ती असे चार जण १० ऑगस्ट ला सकाळी ११.५० च्या विमानाने दिल्ली कडे प्रयाण केले. वैमानीक अधुन मधुन प्रवासमार्गा बदल सुचना देत होता. मी आपला खिडकीतुन बाहेर बघत त्या चमकदार ढगाMमधुन खाली दिसणारी जमीन शोधत होतो. केवळ तळेगाव मागे जाईपर्यत खालचे दिसत होते, पुढे विमानाने अधिक उMचीने ढगाMच्या वरुन जाण्यास सुरुवात केली आणी मग मात्र ढगाMमधुन परावर्तीत होणार्‍या प्रखर सुर्यप्रकाशामुळे सतत खिडकीतुन बाहेर बघणE अवघड झाले. काही वेळाने हवाईसुMदरी खाद्यपदार्थ घेऊन आल्या, मी घरुन पोटभर नाष्टा केला होता त्यामुळे मी काही घेतले नाही. वैमानिकाने आपण दिल्लीमधे पोहोचत असल्याचे साMगितले. बरोब्बर १.५० ला विमान उतरले. विमानतळावर उतरल्यावर तिथला उकाडा लगेच जाणवायला लागला एकदम खराब हवा आणी भयंकर उन्हाने सारे त्रस्त झाले होते. एका हॉटेलमधे बरोबरचे सामान ठेऊन दिल्ली फिरणे आणी भोजन अश्या उद्देशाने बाहेर पडलो. छोले, आलु पराठा आणि दही असा झकास बेत हाणला.

बाहेर उन अक्षरशः भाजुन काढत होते. तिथुन जवळाच असलेल्या मेट्रो रेल्वे स्थानकावर गेलो. कुठे जायचे असे काही न ठरवता पिवळा मार्ग आणी निळ्या मार्गावरील मेट्रोमधुन एका टोकापासुन दुसर्‍या टोकापर्यंत असे जवळ जवळ तिन तास त्या वातानुकूलीत गाडीमधे घालवले. स्वयंचलीत तिकीट तपासणी यंत्रणा जिथे टोकन दाखवल्या शिवाय आपण स्थानकात जाऊ किवा आतुन बाहेर येऊ शकत नाही, फलाट ओलाMडण्यासाठी असणारे स्वयंचलीत जिने, मेट्रो रेल्वेची आपोआप उघड-बंद होणारी दारे, प्रत्तेक गाडीमधे असणारे बंदुकधारी सुरक्षा अधिकारी आणी प्रवासादरम्यान येणार्‍या स्थानकाबद्दल महिती आणी सुचनाही दिली जाते. तिथुन बाहेर पडावेसे वाटतच नव्हते संध्याकाळचे ६ वाजत आले होते. हरीद्वार ला जाण्यासाठी दिल्लीतील ह. निजामुद्दिन स्थानकावरुन ९.१५ ची चेन्नई - डेहराडुन एक्सप्रेस पकडण्यासाठी नवी दिल्ली स्थानकावर पोहोचलो. येथुन ह. निजामुद्दिन ला जाण्यासाठी लोकल उपलब्द्या आहेत. पण त्या बद्दल माहिती देणारा एकही सुचना फलक येथे शोधुनही सापडणार नाही. नवी दिल्ली ते ह. निजामुद्दिन पर्यंतचे लोकलचे तिकीट फक्त ३ रु. आहे पण लोकल मधे मुMबैइ प्रमाणे इथेही लोकलमधे प्रचंड गर्दी असते. ह्या एवजी इथुन रिक्षाही मिळू शकतात मात्र त्या साठी १५०-२०० रु मागितले जातात. आम्ही लोकलने जाणE पत्करले. त्या भयंकर गर्दीत स्वतःला कोMबुन घेत ८.३० ला निजामुद्दिन ला पोहोचलो. इथे पोहोचल्यावर कळाले की गाडी सुमारे पाउण तास उशीराने येणार आहे. मग तिथेच फलाटावर बसकण मारली. बरोब्बर साMगितलेल्या वेळेनुसार गाडी आली. बर्थ चे तिकीट काढले असल्यामुळे निवाMत झोपुन प्रवास झाला. वेळापत्रकानुसार ही गाडी ३.१५ ला हरिद्वार ला पोहोचते. आधी झालेला उशीर आणी वेळोवेळी घ्यावे लागलेले थाMबे ह्यामुळे हरिद्वार ला पोहोचण्यासाठी ६.३० वाजले.

हरिद्वार येथे आम्हाला घेण्यासाठी पगमार्क चा प्रतिनीधी (अर्जुन) आमची वाटच पहात बसला होता. इथुन पुढच्या प्रवासाची सर्व जबाबदारी पगमार्क च्या हवाली केली होती. आमच्या आधी पोहोचलेले पगमार्क बरोबर आलेलेआलेले सोव.करमकर, सोव. दाबके,सोव. मयुरी आणी रामकृष्ण असे चार लोक ऋषीकेश येथे मुक्कामस उतरले होते. त्या दिवशी हरीद्वार मधे कावडयात्रा सुरू होती, अनेक भक्तगण कावड मधून गंगा जल घेऊन भोलेनाथला अभिषेक करण्यासाठी घेऊन चालले होते. हरिद्वार मधील गंगातीरावरील प्रशस्त घाटावर हजारो भावीक जमा झाले होते. सकाळच्या प्रसन्न वातावरणात चालकाने गाडीमधे लावलेले शिवगान एकत साधारणपणे एका तासाभराच्या प्रवासानंतर ऋषीकेश ला पोहोचलो.


पुढचे मुक्कामाचे ठिकाण होते जोशीमठ. आद्य शंकराचार्याMनी येथे जोतीर्मठाअची उभारणी केली म्हणुन त्याला काही मंडळी त्याला ज्योतिर्मठ नावनेही संबोधतात. ऋषीकेश ते जोशीमठ अंतर २५० किमी चे असुन तिथे होणारा प्रवास हिमालयाचा पर्वतराMगेमधुन राष्ट्रिय महामार्ग ५८ वरुन होतो. ह्या संपुर्ण रस्त्याची देखभाल सिमा सडक संगठन (बी. आर. ओ.) ह्या लष्करी संस्थेतर्फे केली जाते. ऋषीकेश पासुनच पावसालाही सुरवात झाली होती तरी फरसा जोर नव्हता तर हवाही अतिशय अल्हाददायक वाटत होती. अतिशय वेडिवाकडी वळ्णE अरुMद रस्ते आणी पाउस ह्यामुळे चालक फारसा वेगाने गाडी चालवु शकत नव्हता. ब्यासी आणी श्रीनगर मागे टाकले पुढे देवप्रयाग, रुद्रप्रयाग, कर्णप्रयाग अशी देवभुमीवरील गावे मागे टाकत चमोली येथे पोहोचलो तो पर्यत रात्रीचे ८ वाजुन गेले होते. ह्या भागातून प्रवास करताना वेळेचे बंधन पाळावे लागते. इथे ठरावीक वेळेनंतर घाटातुन प्रवास करण्यास मनाई केली जाते तरी चार ते पाच गाड्या एकत्र असतील तर पुढे जाऊ दिले जाते. त्यानुसार आम्ही आजुन थोडे पुढच्या गावी पिपलकोटी ह्या जोशीमठ पासुन ३३ किमी अलीकडे असलेल्या गावी मुक्कम करण्याचे ठरवले. सकाळी लवकर उठुन निघायचे ठरल्यामुळे जेवण केल्याकेल्या लगेच झोपी गेलो तसेच बाहेर पडणार्‍या पावसाच्या आवाजामुळE पहाटे लवकर जागही आली. पटापट आवरुन गाडीमधे जाउन बसलो, जेमते २ किमी पुढे गेलो असेल तर पुढे दरड कोसळल्याने रस्ता बंद, आता इतक्या सकाळी हा राडारोडा कोण काढणार त्यामुळे तिथुन माघारी परत फिरलो, येताना बी आर ओ चे ऑफिस दिसल्याने तिथे दरड कोसळली असल्याबद्दलची माहीत दिली आणि परत एका हॉटेल मधे आश्रय घेतला.


दुपारी १२.३० च्या दरम्यान मार्ग पुन्हा खुला झाला जोशीमठ ला पोहोचे पर्यंत दुपारचे ३ वाजत आले होते. आणी पुढे जाण्यासाठीचे फटक उघडण्याची वेळ ४.३० ची होती. मग तिथे जेवणाचा कार्यक्रम पार पाडला. काही मंडळीनी इथे गरम कपड्याMची खरेदी केली. पुढचा मुक्कम गोविMदघाट ह्या ठिकाणी करायचा होता ६.३० पर्यंत तिथे पोहोचलो सुद्धा. रात्रीचा जेवणाचा बेत तंदूर रोटी आणी सरसोM दा साग आणी डाळ भात. इथे पर्यंतचा संपुर्ण प्रवास हा गंगा नदी आणी तिची मुख्य उपनदी अलकनंदा च्या सनिध्याने झाला होता. जोशीमठ ते गोविMद घाट अंतर २१ किमी आणी लागणारा वेळ साधारणपणE एक तासा पेक्षा अधीकच तर समुद्र सपाटीपासुनची उMची जोशीमठ येथे १८९० मीटर आणी गोविMद घाट १८२८ मीटर.

गोविMदघाट येथे अलकनंदा आणी लक्ष्मण गंगा नदीचा संगम आहे, त्यामुळे ह्याठिकाणाला केशवप्रयाग नावानेदेखील ओळखले जाते. हेमकुMड साहेब ला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इथे शिख समाज इथे मुक्कामाला असतो त्यासाठी त्याMनी इथे गुरुद्वारा उभारलेला आहे. सकाळी न्याहारीला आलू पराठा खाल्ला आणी ८.३० च्या सुमारास चालायला सुरुवात केली. पुढचे मुक्कामाचे शेवटचे ठिकाण घाMगरीया ह्या सुMदर गावी होता. इथे जाण्यासाठी पुढचा १३ किमी चा प्रवास हा लक्ष्मणगंगा नदीच्या काठाने पायी अथवा घोड्यावरुन करावा लागतो. घोडेवाला त्यासाठी ५४० रु आकारतो. तर आपल्या बरोबर असणारे सामान वाहुन नेण्यासाठी पिट्टु देखील येथे ३४० रु. मधे उपलब्ध आहेत तर वृद्ध लोकाMसाठी पालखी सारखी सोय इथे उपलब्द्य आहे. पगमार्क मधुन आलेल्या लोकाMमधे दोन पन्नाशी ओलाMडलेल्या महीला होत्या त्याMनी घोडा करण्याचे ठरवले तर बाकी आम्ही चालत निघालो.

पुर्णपणे ढगाMनी अच्छादलेले आभाळ मधुन होणारा पावसाचा शिडकावा सोबत घोMघावत वहाणारी लक्ष्मणगंगा. जाताना ४ किमी वर पहीले गाव लागते ते म्हणाजे पुलना. त्यानंतर ६किमी वर भ्युMडार हे पुलना इथल्याच रहिवाश्याचे उन्हाळी मुक्कामाचे ठिकाण. सुरवातीला चालताना आजिबात थकवा जाणवत नव्हता. शेवटचे तिन किमी मात्र जास्त चढावाचा अधीकाधिक उMचीवर घेऊन जाणार होता.वाट चाMगली बाMधुन काढली असली तरी चालताना घोड्याMच्या वर्दळीकडे लक्ष द्यावे लागते. चुकून एखाद्याचा धक्का लागायचा आणी आपण रस्त्याच्या काठावर उभे असल्यस १० फुट खाली झुडपात किMवा लक्ष्मण गंगेत. घाMगरीया ३०४८ मीटर उMचीवर आहे. इथे एक मजेशीर गोष्ट पहायला मिळाली. घटनेचे शब्दात वर्णन करणे खरे तर मला जमेल असे वाटत नाही. तिथे काही उMचीवर मधमाश्याMची भलीमोठी पोळी होती, त्यावर बसलेल्या माश्याची संख्याही प्रचंड होती. त्यामुळे त्या समुहात बाहेरुन एखादी मधमाशी आली तर तिला बसण्यासाठी जागा देण्यासाठी भोवतालच्या परिघातील माश्या एकदम बाजुला सरकायच्या त्यावेळेस लाMबुन पहाणार्‍यास ते एका पाण्यात दगड पडल्यावर उठणार्‍या तरंगाप्रमाणे दिसे. थोड्याचवेळात घाMगरीया गावात प्रवेश केला. तिथे प्रितम नावाच्या एका मध्यम आकाराच्या होटेल मधे आमची निवासाची सोय केली होती. हळू हळू आMधार पडू लागला होता. तपमान साधारणपणे १२-१५ सेल्सियस असावे. चालुन आलेला थकवा जाणवत होता त्यामुळे गेल्या गेल्या बिछान्यावर आडवा झालो. तासा दिड तासाने अर्जुन ने जेवण्यासाठी बोलवले म्हणुन उठलो. जेवणासाठी मस्त गरमगरम आलू पराठा आणी दोन तिन प्रकारच्या पंजाबी पद्धतीच्या भाज्या साMगितल्या होत्या. जेवण झाल्यावर मात्र इथल्या तपमानाचा खरा परिणाम जाणावू लागला. जेवता जेवताच अर्जुन ने दुसर्‍या दिवशीचा कार्यक्रम साMगितला, मग फारसे इकडेतिकडे न करता सगळीच मंडळी झोपण्यासाठी गेली. उद्या फुलाMच्या दरीमधे जायचे होते. आणी ४-५ किमी पेक्षा अधीक अंतर चालायचे होते.

सुभाष ने सकाळी ५.३० चा गजर लावला होता पण त्या आधीच आम्हाला जागही आली. मस्तपैकी बादलीभर गरम पाणी (२५रु) मागवून आMघोळ केली आणी पटापट तयार झालो. होटेलच्या खानावळीमधे जाउन सकाळचा नाष्टा म्हणुन आलु पराठा आणी बटर टोस्ट आणी चहा पिला. रात्रभर पाउस पडुन गेल्यानंतर काहीसा थाMबला होता. होटेलचे मालक रघुविरजी स्वतः येण्यासाठी तयार झाले होते. सकाळचे ८ वाजले होते. व्ह्याली च्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. जाताना सुरुवाती पासुनच वेगवेगळ्या प्रकारची लहान मोठी रंगीवेरंगी पुले दिसू लागली होते. तिथे जाण्यासाठी एका चेक पोSटवर प्रवेश शुल्क भरावे लागते पण रघुविरजीMनी मागीलबाजुने आत जाउन आमचे शुल्क किती भरले ते काही कळू शकले नाही. इथुन पुढे रघुविरजीनी वाटेत दिसणार्‍या प्रत्तेक फुलाबद्दल माहीती देणास सुरुवात केली.




इथले प्रत्तेक फुल / वनस्पती / प्राणी, त्याचे स्थानीक नाव, शास्त्रीय नाव, त्याचे औषधी उपयोग अशी प्रचंड बहुमुल्या माहिती अतिशय उत्साहाने साMगत होते. आणी ती ऐकताना आणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करताना आमची मात्र तारंबळ उडत होती. पुढे एके ठिकाणी पुष्पावती नदीचे पात्र ओलाMडुन नरपर्वताच्या उतारावर पसरलेल्या पुलाMच्या दरीमधे प्रवेश केला. जंगली गुलाब, अर्चा, जिरेनियम, जटामासी, बिस्टोर्टा, बालछडी, अस्टर, बुर्हन्स, प्रिम्युला, स्पिरेया, एनेमुन, वनकाकडी आणी पुराणाकाळात ज्यावर लिखाण काम केले जायचे ते भोजपत्र, अशी अनेक फुले त्याMनी दाखवली. मधेच पावसाची जोरदार सर येउन गेली. जाण्याच्या मार्गावर दोनच दिवसापुर्वी दरड कोसळाल्यामुळे दरीमधे जाण्याचा मार्ग अवघड झाला होता त्या मातीच्या ढिगार्‍यावरुन आणी एके ठिकाणी बर्फावरुन चालत आणी दरीची सुMदरता पहात मार्गक्रम सुरु ठेवला जसजसे आपण पुढे पुढे जातो तसतसे वेगवेगळ्या प्रकारची पुले दिसत. रघुविरजीMनी साMगितल्यानुसार हा इथला दिसणारा फुलाMचा देखाव तसा अल्पकाळच असतो आज ह्या ठिकाणी पहायला मिळालेली फुले आजुन १५ दिवसाMनी पहायला आलो तर कदाचीत दिसणारदेखील नाहीत त्याची जागा दुसर्‍याच फुलाMच्या बहराने घेतलेली असेल. पुढे जाउन एका प्रचंड आकाराच्या शिळEखाली बसुन बरोबर आणलेला पुरीभाजीचा डबा संपवला. पावसाने चाMगलाच जोर धरला होता. त्यामुळE तिथेच आजुन काहीवेळ रघुवीराजीMच्याकडुन मिळणारी माहीती एकत बसलो त्यानुसार - १९३१ मधे ब्रिटीश गिर्यारोहकाMचा ६ जणाMचा एक ग्रुप येथे आला होता. त्याMच्या मधे असलेला FरEन्क स्मिथ ला ह्या भागात फुललेली ही असंख्य फुले दिसली त्यानंतर काही काळाने परत तो फक्त ह्या फुलाMच्या आभ्यासासाठी चार महीने ह्या भागात येउन राहीला.त्या आभ्यासावर त्याने १९३८ मधे "The Valley of Flowers" हे पुस्तक लिहीले त्याचे पुस्तक वाचुन १९३९ मधे ज़ॉन मार्गारेट लेग्गे नावाची एक महीला ह्या भागाचा आभ्यासकरण्यासाठी इथे येउन राहीली. तिने इथुन काही रोपे नेउन तिच्या घराजवळच्या परिसरात त्याची यशस्वी लागवडही केली. दुर्दैवाने तिच्या अभ्यासकाळातच ह्याच ठिकाणी अपघाताने तिचा मृत्यु झाला. व्ह्याली मधे ५ किमी वर तिचे स्मारक उभारलेले आहे. पुराण कथेनुसार जेव्हा श्री लक्ष्मणाने इथे बसुन तपस्चर्या केली होती तेव्हा देवदेवताMनी स्वर्गामधुन त्याMचावर फुलाMचा वर्षाव केला होता त्याचीच बिजे ह्या दर्‍याखोर्‍याMमधुन आजही फुलत आहेत.



पावसाचा वाढलेला जोर पाहुन रघुविरजीMनी इथुनच परत माघारी फिरण्याची सुचना वजा विनंती केली, कारण मगाच्या ठिकाणी पुन्हा दरड कोसळण्याची भिती होती. परत नदीचे पात्र ओलाMडले तोपर्यंत पाहिलेल्या फुलाMची असंख्य छायाचित्रे जमाकेली होती मनातही आणी कॉमेरातही. ३.३० च्या सुमारास हॉटेलवर परतलो. घाMगरीयाचा परिसर पर्यटकाMनी गजबजुन गेला होता. तेव्हा एक बातमी समजली की इथुन बद्रिनाथ ला गेलेला एक ग्रुप बद्रिनाथच्या वाटेवर आणी त्याच आयोजककडुन पुण्याहुन येणारा आजुन एक ग़्रुप चमोलीमधे अडकुन पडला आहेऽसे अनेक पर्यटक वाटेवर अडकुन पडले होते त्याMचा मदतीसाठी रघुविरजीनी आमचा निरोप घेतला. रात्री जेवण म्हणुन एक मस्तपैकी तंदुर रोटी आणी पंजाबी भाज्या आणी दाल राईस असा बेत होता. आजचा प्रवासाचा ४था आणी घाMगरीया मधला दुसरा दिवस होता. पुढचा बेत हेमकुMड ला जायचा होता त्या नुसार तिथल्या भौगोलीक स्थितीबद्दल अर्जुनने सगळ्याMना पुर्वकल्पना दिली. हेमकुMडला जाण्यासाठी चे घाMगरीयावरुन अंतर ५ किमी चे तर उMची ३०४८ मीटर वरुन थेट ४३३० मीटर उMचीवर घेउन जाणारी. एकदम उभी चढण चढण्यासाठी ४ फुट रुMदीची वाट असुन तिथे जाण्यासाठी घोडा (३४० रु) करता येऊ शकतो. अशी माहीती एकल्यावर सगळ्याMनीच घोड्यावरुन निदान वरपर्यMततरी जाण्याचा निश्चय केला. मी मात्र इतक्या लाMब आलो ते कशाला घोड्यावर बसुन जायला छ्या. त्यामुळे मी आणी अर्जुन चालत निघालो.

आजचे हवामान अतिशय खराब होते. आधुनमधुन पावसाच्या सरी कोसळतच होत्या आणी त्यातच ढगाMनी भरुन राहीलेले कोMदट वातावरण चढताना अधिक त्रासदायक ठरत होते. तरीपण अर्जुनच्या सोबतीने पहीले २.५ किमी पर्यंत एकही थाMबा घेतला नाही ३ किमी वर एका टपरीमधे मस्त गरम गरम मसालेदार चहा प्यायला मिळाला. अश्या ठिकाणी चहा पिण्यात जी काही मजा मिळाली ती औरच. पुढे चालायला सुरुवात केली, पाउस थाMबला होता त्यामुळे असंख्या पक्षी - पाखरं पाहुन क्षणभर अर्जुनही तिथे थाMबला. आत्तापर्यMतच्या त्याचा अनेकवेळा घडलेल्या हेमकुMडच्या प्रवासात न दिसलेले काही पक्षीही त्याने त्याच्या केमेरामधे टिपले. इथे दिसणारी फुलेही वेगळी, जसजसे वर जात होतो तसे हिमालयाची राणी म्हणुन ऑळखले जाणारे ब्लु पॉपी आणी इथले राजपुष्प ब्र्हम्ह्कमळ, ईत्यादी वेगवेगळ्या प्रकारची पुले दिसु लागली आणी त्याMचे निरीक्षण / छायाचित्रण करत ४ किमी चे अंतर कापले. इथे पोहोचल्यावर अर्जुन ने साMगितले की इथुन पुढे आता आपल्याला ११०० पायर्‍अया चढायच्या आहेत. असे म्हणाता क्षणी माझ्या डोळ्यासमोर रायगड उभा राहीला. त्याच्या मागे मागे मी चालत राहीलो. पाउस थाMबला तरी रेनकोट आजुन आMगावरच होता त्यामुळE तो आता घामाच्या धाराMनी आतुन ओला झाला. रेनकोटही काढुन टाकला, चालताना काही ठिकाणी साचलेल्या बर्फा जवळुन जाताना एकदम मस्त वाटायचे इतके चालल्या नंतरही थकवा , भुक किMवा तहान काही जाणवतच नव्हते. जोशीमठाच्या अलिकडे बरेच पर्यटक अडकुन पडल्यामुळे आज फारशी वर्दळ नव्हती नाहीतर कदाचीत वाटेतुन येणार्‍या-जाणार्‍या घोड्याMनी चढाई करणे शक्य झाले नसते. वरुन गुरुद्वारामधुन चालु असलेल्या प्रार्थनेचा आवाज कानावर पडु लागला. शिख समाजाने लोकाMच्या स्वागतासाठी इथे कमानी उभारल्या आहेत केवळ ३.३० तासातच संपूर्ण अंतर कापुन आमच्या आधी पोहोचलेल्या मंडळीMमधे जाउन सामील झालो. इथे तपमान बरेच कमी असल्याचे जाणवत होते आणी परिसर आजुनही ढगाMमधे अच्छादलेलाच होता. मधुनच काही क्षण एकदम ढग बाजुला झाले आणी त्या निळ्याशार हेमकुMडाचे दर्शन घडले. तिथे लक्ष्मणाचेही एक मंदिर असुन तिथे जाउन दर्शन घेतले. पायातले बुट काढले आणी सरळ त्या हेमकुMडातुन खाली वाहुन जाणार्‍या पाण्यात पाय सोडले, पायातिल सर्व वेदना - संवेदना नष्ट होत आहेत ह्याची जाणीव झाली. मग गुरुद्वारा मधे प्रवेश केला. भव्य सभा मंडप, भावीकाMसाठी बसण्यासाठी अंथरलेली जाड सतरंजी आणी थंडी वाजु नये म्हणुन जाड जुड रजया तिथे ठेवल्या होत्या. उच्चप्रतीची वस्त्रे, काही शस्त्रे, रंगिबेरंगी फुले ह्यानी गुरुसाहेबाMचे स्थान सजवले होते. गुरुस्तवन चालु होते. थोड्यावेळाने साजुकतुपात केलेला गव्ह्याच्यापिठा पासुन तयार केलेला शिरा प्रसाद म्हणुन वाटण्यात आला. मग काही वेळ बसुन गुरुसाहेबाMचे दर्शन घेतले आणी तिथे असलेल्या लंगर जिथे भाविकाMच्या भोजनाची व्यवस्था केलेली असते तिथे गेलो. मस्त गरम गरम वाफाळलेली खिचडी पोट भरेपर्यंत खाली. मस्त चहामसाला घालुन तयार केलेला चहा पिला आणी तिथुन परत बाहेर पडलो. मी आणी अर्जुन गुरुद्वारा समोर असलेल्या डोMगर राMगे वर फुललेल्या ब्रम्हकमळाचे फोटो काढण्यासाठी चढलो. फोटो काढताना परत एकदा हेमकुMड सरोवरावरील असलेले ढगाMचे अच्छादन बाजुला झाले. सरोवराचा नितळपणा, मंत्रोच्चाराने भारलेले वातावरण पाहुन माझे हात जोडले गेले, ह्या सृष्टी निर्मात्याला वंदन करुन ते डोळ्याMचे पारणE फेडणारे दृश्य मनात साठवुन घेतले. परत कमानी पाशी येऊन पोहोचलो. बाकीचे सवंगडी आमची वाटच पहात होते. उतरताना सगळ्याMनी घोडा करणे टाळले आणी उतरण्यास सुरुवात केली. उतरताना पायर्‍याMवरुन उतरायचे सोडुन जरा लाMबच्या घोड्याMना चढण्या साठी सोईच्या अश्या रस्त्यावरुन उतरायला सुरुवात केली. जेष्ठ व्यक्तीMची जबाबदारी असल्यामुळE अर्जुन त्याMच्या बरोबरीने चालु लागला. पहीले दोन किमी म्हणजे पायर्‍याMचा रस्ता जिथे येउन मिळतो तिथपर्यंत मी एकदम झपाझप पावले टाकत उतरलो तर ह्या आवेशात मला उतरताना पाहुन बरोबरीने उतरणारे सरदाराMनाही मला "ओ जरा धिरे धिरे' असा सल्ल दिला काहीMनी मला बिस्किटे खायला दिली मी ती खिशात भरुन पुढच्या थाMब्यावर चहा बरोबर खाणासाठी शिल्लक ठेवली. पुढे गेलेल्या बाकिच्या मंडळीना एके ठिकाणी गाठले. तिथेच एका टपरीमधे चहा पिण्यासाठी थाMबलो. तोपर्यंत अर्जुन आणी दोन्ही काकु येउन पोहोचले. थोडे थाMबुन परत पुढचा प्रवास सुरु केला. जरा थोडे पुढे जातो न जातो तोच हवा एकदम स्वच्छ झाली तर हळूहळू उनही पडु लागले होते त्यामुळE मी सुद्धा घाईने पुढे जाण्याऐवजी अर्जुन बरोबर राहुन ह्या भरभरुन वहाणार्‍या निसर्गाचे निरिक्षण करणE पसंत केले. आत्तापर्यंत ३ किमी खाली आलो होतो. दरीतील ढग हटल्याने खालचे गर्द झाडीमधे ह्या पर्वतराजीच्या कुशीत वसलेले घंगरीया . घाMगरीया बद्दल साMगायचे तर ते पुर्णपणE व्यवसायीक तत्वावर वसलेले गाव. इथे ह्या लोकाMचे वास्तव्य फक्त ६ - ७ महिन्याMपुरते डिसेMबर ते एप्रिल पर्यंत पुर्णपणE बर्फाच्छादित असतो. आणी ह्या भागत केवळ वन्य प्राण्याचे राज्य असते. आत्तापर्यंत बरेचसे उतरुन आलो होतो. जितका आनंद चढाई करताना मिळाला त्याही पेक्षा अधिक आनंद उतरताना मिळाला. ४ पर्यंत आम्ही खाली पर्यंत येउन पोहोचलो. रुम वर जाउन सगळ्याMनी आMघोळी केल्या. जरा ताजेतवाने होउन मग पत्त्याMचे काही डाव झाले तो पर्यंत अर्जुनने कोणाला तरी साMगुन सगळ्याMसाठी गरम गरम गुलाबजाम मागवले. सगळ्याMच्या चेहर्‍यावर वा !! घडलेल्या कष्टाचे चिज मिळाले हेच भाव होते.घाMगरीया मधली आजची शेवटची रात्र उद्या सकाळी उठुन परतीचा प्रवास सुरु होणार होता. रात्रीचा जेवणाचा बेत नेहमीप्रमाणेच मस्त पैकी तंदुर रोटी आणी पंजाबी भाज्या, आज सोबतीला पिण्यासाठी गरम पाणी देखिल मागवले होते. रात्री छान झोप लागली सकाळी फारशी गडबड न करता ७.३० ला उठलो. आज हवा इतकी सुMदर होती आणी चक्क उन पडले होते. असे वाटले आज इथेच राहुन परत एकदा फुलाMच्या दरीमधे जाऊन यावे, पण सुरवातिलाच एक दिवस वाया गेला होता त्या मुळे हातात एकही जास्तीचा दिवस नव्हता. मनाची समाजुत घातली आणी परत फिरलो.

सकाळची कोवळी उन्हे आजुनही पर्वतशिखराMवरच रेMगाळत होती, तर दुरवर दिसणारे हाथी पर्वताचे बर्फाच्छादीत शिखर सर्व पर्यटकाMचे लक्ष वेधुन घेत होते. सुभाष ला एक पक्षीनिरीक्षक भेटला, पक्ष्याMच्या आवाजावरुन किMवा त्याMना पहाता क्षणी तो त्याMची नावे साMगायचे, त्याचाशी ओळख करून घेउन मी पुढे निघालो. ४ तासाMच्या पायपिटी नंतर गोविMदघाट ला पोहोचलो. वहानतळावर गाडीपाशी पोहोचलो तर गाडीच्या खिडकीची एक काच फुटलेली दिसली. चालकाला विचारणा केली असता इथल्या तपमानातील फरकामुळE बरेचदा असा प्रकार घडतो.

गोविMदघाट ते बद्रिनाथ चे अंतर २५ किमी चे असले तरी अवघड रस्ता असल्यामुळे जास्त वेळ लागतो. जाताना वाटेत पाMडुकेश्वराचे मंदिर आहे. लामबगड जिथे पावसाळ्यात हमखास दरड कोसळतेच, पुण्यातिल एक ग्रुप येथेच अडकुन पडला होता. हनुमान चट्टी वरुन पुढे काही वेळातच वेडी वाकडी वळणे घेत बद्रिनाथ ला येउन पोहोचतो. बद्रिनाथ ३०९६ मीटर उMचीवर आहे. दुपारचे २ वाजत आले होते त्यामुळे जेवण करुन प्रथम तिथुन पुढे ३ किमी वर असलेल्या माण ह्या गावी गेलो. तिथे सरस्वती नदीचा उगम असुन सरस्वतीदेवीचे एक मंदिरही आहे. मंदिराला जाण्यासाठी प्रचंडवेगाने वहाणारी सरस्वती नदी ओलाMडण्यासाठी एक अखंड शिळेवर असलेला पुल आहे. पाMडवाMच्या स्वर्गारोहण प्रवासाच्या काळात नदी ओलाMडण्यासाठी भिमाने हा पुल तयार केला. त्यामुळे ह्यास भिमपुल असे नाव पडले आहे. इथला सरस्वती नदीचा वेग पहाण्यासारखा आहे. प्रसिद्ध वसुधारा धबधब्याकडे जाण्यासाठी इथुनच जावे लागते. तसेच व्यसमुनीनी ज्याठिकाणी बसुन महाभारत साMगितले आणी श्री गणेशाने ज्या ठिकाणी बसुन ते लिहीले ती व्यासगुफा आणी गणEशगुफा माण येथे आहे. इथले आजुन एक ठिकाण म्हणजे भारत की आखरी चाय की दुकान जे भारत तिबेट सिमेकडील शेवटचे चहाचे दुकान आहे. तिथे बसुन मस्तपैकी गरम गरम वाफाळालेला तुळस घालुन तयार केलेला दोन कप चहा पिला. संध्याकाळाचे ६.३० वाजत आले होते. मग परत श्री बद्रिनाथाच्या दर्शनासाठी परत आलो. नर-नारायण पर्वताच्या पायथ्याला अलकनंदा नदीच्या तिरावर आद्य शंकराचार्य ह्याMनी हे मंदिर इथे उभे केल्याचे साMगितले जाते. आम्ही तिथे पोहोचलो तेव्ह्या बराच आMधार पडला होता तर नदीच्या पलिकडच्या तिरावर प्रकाशझोतात मंदिराचा दर्शनी भाग उजळुन निघाला होता. त्या भव्य मंदिरात जाउन श्री बद्रिनाथाचे दर्शन घेतले. मंदिराचे निरिक्षण करतच एक संपुर्ण प्रदक्षीणा मारली. भगवान विष्णुMच्य चार धामाMपैकी हे बद्रिनाथधाम म्हणुनही प्रसिद्ध आहे. बद्रिनाथ मंदिराला लागुन अलकनंदा नदीच्या काठावरच एक नैसर्गीक गरमपाण्याचा स्त्रोत आहे तर अनेक कुMडाMमधुन ते पाणी खेळवले आहे. खरेदी साठी इथे चाMगली बाजारपेठ आहे, माळा, रुद्राक्ष, शोभेच्या वस्तु इथे विकत मिळतील. आजुन एक आवश्य खरेदी करण्यासारखी गोष्ट म्हणजे माण इथल्या स्थानीक लोकाMनी तयार केलेल्या अस्सल लोकरीचे कपडे, पहाताक्षणी त्याची खरेदी करुन तुम्ही मोकळे व्ह्याल.

रात्री बदिनाथ येथेच मुक्कम होता. मी, सुभाष आणी मिहिर ने सकाळी लवकर उठुन त्या गरम पाण्याचा कुMडात स्नान करायचे ठरवले होते त्या प्रमाणE पहाटे ४.३० ला उठुन तेथे गेलो. पाणी इतके गरम होते की त्यामधे फार वेळ बसु शकत नाही. पाण्यातुन बाहेर पडल्यावर मात्र एकदम हलक फुलक वाटायला लागले थंडी तर कुठल्या कुठे निघुन गेली. पहाटे उठुन किMबाहुन केवळ ह्याच्या दर्शनासाठी पहाटे उठावे तो नर नारायण पर्वताचा पाठीमागे असलेला निलकंठेश्वर पर्वत. सकाळी सुर्योदयाच्या वेळEस सूर्याची सोनेरी किरणE ह्या पर्वताच्या हिमशिखराला स्पर्श करतात. बाजुला काळोख आणी केवळ लालबुMद दिसणारे ते शिखर, आपले पाय तर अक्षरशः तिथुन हलत नाही, पायाचे तर सोडुनच द्या आपली नजर सुद्धा तिथुन इतरत्र भटकत नाही. ते शिखर इतके उMच आहे की त्याचा अर्ध्या भाग सुर्यकिरणाMनी व्यापला तरी इतरत्र असलेला काळोख हटत नाही. बराच वेळाने तिथल्या हॉटेल वर परतलो. पोटभर न्याहारी केले नेहमीचाच बेत होता मस्तपैकी आलु पराठा.

आजचा प्रवासातला आठवा दिवस होता, चमोली - जोशीमठ वहातुक पुन्हा सुरु झाल्याची बातमी समजली होती, इथला पाउस पुर्णपणे थाMबला होता त्यामुळे आज जास्तीजास्त अंतर कापत किमान ऋषिकेश पर्यंत पोहोचायचे ठरवले. जोशीमठ पासुन जवळच असलेल्या औली या ठिकाणी धावती भेट दिली. आशिया खंडातला सगळ्यात मोठा रोप वे इथे आहे. इथुनच बर्याचश्या पर्वत शिखराMचे दर्शन घडते. अर्जुन ने साMगितलेल्या नावाMपैकी नंदादेवी आणी बर्मन ही दोनच माझ्या लक्षात आहेत. हा सारा परिसर भारत-तिबेट सिमा पोलीसाMच्या अधिपत्याखाली आहे.

जोशीमठ सोडले १३ किमी कसे आलो हे काही कळाले नाही पण गाडी एका बाजुला थाMबली. कळाले की दरड कोसळली आहे म्हणुन कुतुहलापोटी पुढे जाउन पहायला गेलो तर जिपगाडीच्या आकाराचा एक प्रचंड दगड रस्याच्या मधोमध रुतुन बसला होता आणी रस्ते विभागाचे मजुर तो दगड सुरुMग लाउन फोडण्याच्या कामात झटत होते. त्या दगडाला काही छिद्रे पाडली मग त्यात बारुद भरण्यात आले, सगळी तयारी झाली. पोलिसाMनी दोन्ही बाजुMकडील लोकाMना मागे सरकवले. मी सुद्धा तो दगड दिसेल अश्या एक सुरक्षीत जागी जाउन उभा राहिलो. काही वेळाने धडाम्म्म आवाज करत त्या दगडाच्या ठिकर्‍या उडाल्या. तिथे उपस्थित असलेल्या सरदाराMनी पुढे होउन तिथे शिल्लक असलेले दगड बाजुला करण्यात मदत केली आणी रस्ता मोकळा झाला. पुढे फक्त ७ किमी वर असलेल्या हेलंग गावजवळ आलो तर आजुन एक मोठी दरड कोसळली असल्याची बातमी मिळाली तरीपण डोळ्यासमोर दिल्ली दिसत होती म्हणुन पुढे गेलो. तर जवळ जवळ १०० ते १५० फुट रस्त्याचा भाग गाडला गेला होता. एक जेसीबी च्या सहाय्याने तो बाजुला करण्याचे कामही सुरु होते, पण जितकी माती बाजुला केली जाईल तेवढीच परत वरुन पडत होती त्यामुळे बरेच वेळा जे सी बी चा चालक गाडी मागेपर्यंत घेत होता. पण आज निदान संध्याकळापर्यंत तरी रस्ता मोकळा होईल ह्या हेतुने बरेच प्रवासी तिथेच थाMबले होते. भुक लागली होती पण तिथल्या खानावळीत प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे तत्पुरती भुक भागवण्यासाठी काकडी आणी सफरचंद खाल्ले आणी रस्ता उघडायची वाट पहात तिथेच रस्त्यात बसकण मारली. ४.३० वाजुन गेले तरी काही हालचाल नाही म्हणुन पुढे जाऊन पाहिले तर काम बंद झाले होते. आणी आजुनही वरुन दरड सारखी ढासळत होती. तिथल्या स्थानीक पोलिसाMनी आज ते काम होणार नसल्याचे जाहीर केले व सकाळी लवकर कामाला सुरुवात केली जाईल असे साMगितले. ह्या इथल्या गावकर्‍याMना हा प्रकार काही नविन नव्हता त्यामुळे त्याMनी डोMगरावरुन पलीकडे जाण्यासाठी पायवाटा तयार करुन ठेवल्या होत्या आणी त्याच्या उपयोगाने पलीकडील बाजुस अडकलेली अनेक मंडळी रात्री उशीरा पर्यंत येत होती. हे पाहुन आम्ही रात्र इथेच काढुन पहाटे लवकर उठुन पलीकडे जायचे आणी तिथुन ऋषेकेश च्या दिशेने मिळेल त्या गाडिने सुटायचे आणी नंतर जेव्ह्या रस्ता चालु होइल तेव्हा आमची गाडी घेउन चालक आम्हाला दिल्लीमधे भेटेल असे ठरवून एका लॉज च्या सज्जा मधे रात्री चा मुक्कम ठोकला. रात्री जेवण मात्र एकदम छान मिळाले, पराठा नव्ह्यता तर मस्त पैकी वागे बटाट्याची रस्सा भाजी आणी, फुलके आणि डाळ भात.

सकाळी ठरल्या प्रमाणE गाडी तिथेच सोडुन चालायला लागलो. सुदैवाने दोन पिट्टु तिथे उपलब्ध झाले पण तरीही काही सामान आम्हाला पाठीवर घ्यावे लागले. पिट्टु ला किती अंतर आहे विचारले असता तो आमच्या सारख्याMना २ ते ३ तास लागु शकतील असे म्हणाला. डोळ्यासमोर सिMहगड इतकी चढण आणी तिही उपाशी पोटी, पण दिल्लीची परत एकदा आठवण काढुन चालायला सुरुवात केली. कालपासुन गुढग्यात आलेली कळ चढताना त्रास देत होती. थोडे वर चढुन गेल्यावर एका घराजवळ पोहोचलो. घरातील माणासाने आमचे हाल पाहुन चहा पाण्यासाठी थाMबण्याची विनंती केली. पण वेळेअभावी त्याला नकार (नाइलाजाने) देत पुढच्या मार्गक्रमाबद्दल माहिती करून घेतली. रस्त्याने जाताना पलीकडील बाजुने आलेली काही पुणेकर मंडळी घेतली. तुफान पावसामुळे ते १४ तारखेपासुन चमोली मधेच अडकुन पडले होते बिचारे. बराच वेळ मध्यावरील सपाटीच्या भागावरुन पुढे चालत राहिलो. हळू हळू समोरुन येणार्‍या लोकाMची संख्या वाढत होती. ज्या ठिकाणाहुन खाली उतरायला सुरुवात करायची तिथे येउन पोहोचलो. अतिशय अरुMद जेमतेम एक माणुसच एका वेळेस जाउ किMवा येउ शकेल एवढीच तिव्र उताराची वाट. वरती येणार्‍या लोकाMमुळे खाली उतरताना अडचण येऊ लागली होती. एका ठिकाणी समोरुन आलेल्या सरदाराला वाट देण्यासाठी मी थोडा कडेला झालो तर त्याची बायको ओरडली कारण मी त्याचा समोरुन एकदम गायब झाल्याप्रमाणE ८ -१० फुट खाली घसरलो होतो. मग परत उठुन उभे रहायचे कष्ट न घेता तसाच गवतावरुन घसरगुMडी करत खालपर्यत आलो. पोहोचलो तेव्हा ९ वाजत आले होते, खाली वहानाMची भरपुर गर्दी उसळली होती सुदैवाने चमोली पर्यंत जाण्यासाठी एक जीप लगेच मिळाली, हर हर महादेव अशी घोषणा देत तिथुन पुढे तासाभरात चमोली येथे पोहोचलो. थाMबुन वाट पहाण्यात काही अर्थ उरला नव्हता, त्यामुळे तिथुन ऋषीकेश पर्यंत जाण्यासाठी सुमो ठरवली. चमोली येथेच एका हॉटेल मधे जेवण केले आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. जाताना अतिशय सुMदर वाटणारा तो रस्ता आता कोसळलेल्या दरडीMमुळे भयानक वाटत होता. जवळ जवळ ३० ते ४० ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या तर त्याखाली सापडुन काही लोकाMचे प्राणही गेले होते अशी माहीती सुमोच्या चालकाने पुरवली.

कर्णप्रयाग च्या जवळ येउन पोहोचलो तर आमच्या गाडीचालकाचा फोन आला रस्ता मोकळा झाला असुन तो आता चमोली पर्यंत येउन पोहोचला तरी त्याच्या आणी आमच्यामधे २ तासाMचे अंतर होते. सुमो चालकाने पुढे पाउस आणी आजुनही कर्णप्रयागच्या पुढे आणी ब्यासी जवळ दरड कोसळण्याच्या जागा असुन पाउस पडत असल्याची माहिती दिली त्यामुळे आमच्या गाडीची वाट न पहाता थेट ऋषीकेश पर्यंत सुमोनेच जायचे ठरवले. चालक अतिशय कोव्शल्याने आणी चपळपणे गाडी चालवत होता पुढे कर्णप्रयागजवळ एक दरड कोसळली होती पण आम्ही तिथे पोहोचे पर्यंत रस्त्यात पडलेला राडारोडा बाजुला करण्याचे काम वेगाने चालु होते. अर्ध्या तासाच्या विश्राMतीनंतर पुढे कुठेही न थाMबता ५.३० ला ब्यासी च्या अलीकडे एका ढाब्यावर थाMबलो. बन म्हस्का आणी गरम गरम चहा पिऊन पुढचा प्रवास लगेच सुरु केला. पावसाला सुरुवात झाली होतीच ब्यासी मागे टाकले. चालकाने आदल्यादिवशी दरड कोसळली होती ते ठिकाण दाखवले. आजुनही बराच राडा तिथेच पडुन होता आणी पावसाचा जोर वाढल्यावर पुन्हा दरड कोसळणार आणी रस्ता बंद होणार होता. संध्याकाळी ७.३० ला ऋषीकेश ला सुखरुप पोहोचलो. आम्हा चौघाMना उद्या सकाळी ६ च्या आत दिल्ली गाठणे गरजेचे आणी मला आणी सुभाषला तर ९.१५ विमान पकडण्याचा दुष्टीने जायलाच लागणार होते. ऋषिकेश ला असलेला वैसिष्ट पुर्ण रामझूला ओलाMडुन तिथल्या प्रसिद्ध चोटिवाला रेस्टॉरंट येथे उत्कृष्ट प्रतिचे जेवण करुन अर्जुन चा निरोप घेतला. १०.०० वाजता निघणार्‍या तिथल्या स्टेट ट्रान्सपोर्ट च्या आरामबसने दिल्ली (२०० रु.) ला सकाळी ४.३० ला पोहोचलो. आणी आम्ही सुटकेचा श्वास सोडला, तर सकाळी ११.१५ ला सुखरुप पुण्याला पोहोचलो.





1 comment:

HAREKRISHNAJI said...

आपण किती सविस्तर लिहीले आहात. मला असे लिहीता आले असते तर. पण फोटो कुठे आहेत ?
फोटो जरुर टाकणे. लज्ज्त आणखीन वाढेल.