Wednesday, August 01, 2007

इMदुरी चा भुईकोट किल्ला......

ऑफिस मधुन त्या भागात रहाणार्‍या एका मित्रा कडून, तळेगाव पसुन जवळ इMदुरी गावात एक किल्ला आहे अशी थोडी माहिती मिळाली. ईतक्या जवळ किल्ला असुनही आपल्याला माहिईत कसा नाही ह्याचे थोडे आश्चर्य वाटले, कारण माझ्या डोक्यात किल्ला म्हणले की ट्रेकिMग असे काहीसे डोळ्यासमोर उभे रहाते.
सकाळी मामेभावाला (श्री) ला फोन करुन तयार रहाण्यास साMगितले. सकाळी ८ ला घरून निघालो, पुढे वाकड पाशी श्री च्या घरी गेलो तेथे थोडाफार चहा नष्ता झाला. ९.३० ला मुMबई- पुणे बायपास ला पोहोचलो. फारशी गर्दी नव्हती, वातावरणही अश्या ड्राईव्ह साठी हवे तसेच होते. पावसाची नुकतीच पडुन गेलेली सर, रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी हिरवळ, रस्त्याच्या मधोमध लावलेली फुलझाडे, आधुन मधुन दिसणारी तळी आणी सोबतीला वेगाने वहाणारे वारे प्रवासाची मजा द्विगुणीत करत होते. तळेगाव मधे इMदुरी ला कसे जायचे विचारुन घेतले. पुढे तळेगाव चाकण रोड ला ५-६ किमी चे अंतर कापुन इMद्रायणी नदी चा पुल ओलाMडला. इMदुरी गावात प्रवेश करतानाच डाव्या बाजुला किल्ल्यचे बुरुज दिसले, वळसा घलुन पुढे मुख्य दरवाजा पाशी गेलो, पाहील्यावर आपला ट्रेकीMगचा बेत संपल्याचे लक्षात आलेच.
तिथुन पुढे जवळच भंडारा डोMगर आहे, काहीतरी ट्रेक करायला मिळेल म्हणुन प्रथम तिकडे गेलो तर तिथेही वरपर्यंत गाडी जाते. पण डोMगरावर जाणारा घाट रस्ता मात्र अतिशय नागमोडी वळणे घ्यायला लावतच वरपर्यंत नेतो. घाट चढताना माझी नजर मात्र बाजुच्या अप्रतीम निसर्गावर, त्यामुळे माझी गाडी चालवताना एक दोन वळणाMवर थोडी गडबड झाली, आणी मागे बसलेल्या श्री कडून काही सुचना ऐकायला मिळाल्या. एक मोठे वळण घेउन आपण माथ्यावर पोहोचतो. तिथे मध्यभागीच ओळेने काही गाड्या उभ्या केल्या होत्या, मीही तिथेच गाडी लावली.
भंडारा डोMगर, शिवाजी महाराज आणी तुकाराम महाराजाMची भेट झाली ते ऐतिहासीक ठिकाण. तुकाराम महाराजाMचे एक मंदीर असुन, काही वारकरी मंडळी त्याचे देखभाल करतात. मंदिरात संत तुकाराम महाराज, विठोबा रखुमाई, गणपती , शिवलिMग अशा देवताMच्या मुर्ती आहेत. दर्शन घेउन डोMगर परिसर पहायला निघालो. मंदिरा शेजारी एक मोठा डेरेदार वटवृक्ष आपले लक्ष वेधुन घेतो. मग एक ठिकाण निश्चीत केले आणी तेथुन डोMगर प्रदक्षणा सुरुवात केली. तेथुन सभोवताली दिसणरे दृश्य तर खासच. जसे जसे डोMगर फिरायला सुरुवात केलि तसा हात नाकाजवळ न्यावा लागला, तिथे रस्त्याच्या कडेनेच लोकाMनी नैसर्गीक विधी केले होते. ही मंडळी काही सुधारायची नाहीत, तसेच तिथुन माघारी फिरलो. गाडीला किक मारली थोडे खाली उतरुन आलो. मग एके ठिकाणी थाMबुन परिसरातिल काहि फोटो काढले. घाट जितक्या सफ़ाईने चढलो तितका तो उतरताना सोपा नाही हे लक्षात आले.
ईMदुरी गावत परतलो. तिथे किल्ल्याचा बाहेर एका माणसाला विचारले तर त्याने आत जाउन देवी चे दर्शन घेण्यास साMगीतले. गाडि किल्ल्याच्या आतमधे थेट मंदिरापर्यंत नेली. कडजाई देविचे दर्शन घेतले. मMदिराचे बाMधकाम चालु आहे. किल्ल्याच्या आतला परिसर एकदम दुर्लक्षीत आहे. झाडा झुडपाMचे रान माजले आहे. तटबंदी पर्यंत जाणेही अवघड आहे. गडाचे प्रवेशद्वार मात्र बघण्यासारखे आहे. मग गडाच्या बाहेर जाउन बाहेरील तटबंदीचे फोटो घेतले. इMद्रायणीनदी चे पात्र दुथडी भरुन वहात होते. पुल ओलाMडे पर्यंत एक जोरदार पावसाची सर आली पण रस्त्यावर एकही अडोसा नव्हता. बाजुला एक फुलझाडाMची नर्सरी दिसली, घुसलो तिथे. पाउस थाMबल्यावर तिथल्या फुलाMचे काही फोटो टिपले.
पुढे शिरगाव ला गेलो पण गुरुपोर्णिमा निमित्ताने मोठ्या प्रमाणावर भावीक तेथे दर्शनासाठी आले होते. अतिशय अरुMद रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजुस केलेले चार चाकी वहानाचे पार्कीMग आणी तेथेच अडकुन बसलेली आपली PMT ची बस. आता ह्या पुढचे वेगळे दृष्य साMगावे का ??. साई मंदीराच्या कळसाचे दर्शन घेउन मघारी फिरलो. तब्बल तासाभराच्या कसरती नंतर तेथील वहानाMच्या कोMडीतुन बाहेर पडलो. अतीशय भुक लागली होती त्यामुळे आजुन कोठे जायचा बेत रद्द करुन थेट घरी पोहोचलो.








No comments: