Sunday, April 26, 2026

दुर्गराज रायगड मोहीम वृत्तांत - भाग १: ( संकल्प, कूच आणि पाचाडचा विसावा)

 ।। श्री ।। 


।। दुर्गराज रायगड मोहीम वृत्तांत ।।


"प्रस्तुत वृत्तांत असा कीपुणे मुक्कामी असलेल्या आमच्या कचेरीतील (Office) स्नेह्यांनी बहुदिवस आग्रहाचा मांडला होता. 'एखाद्या दुर्गम दुर्गाची भेट घडावीअशी सर्वांचीच मनीषा होतीत्यावरूनविचारवंतांनी मसलत केली कीस्वराज्याची आणि श्री शिवछत्रपतींची राजधानी 'दुर्गराज रायगडयाहून श्रेष्ठ स्थान दुसरे कोणते

दुर्गराज रायगडाच्या दर्शनाचा मनसुबा सिद्ध जाहला. तो दिवस शके १९४८, पराभव नाम संवत्सरे, ऋतू वसंत, मास चैत्र, कृष्ण पक्ष, तिथी नवमी, मंदवार (शनिवार, ११ एप्रिल २०२६) हा सुमुहूर्त निश्चित केला.

रायगड निवडीचे प्रयोजनही विशेष होतेयातील कित्येक जणांनी दुर्गांची महती केवळ ग्रंथांतूनच श्रवण केली होतीपरंतु प्रत्यक्ष दर्शन घडले नव्हतेकित्येकांना आपली अर्भके (Children) सोबत घेऊन शिवचरित्राचा अनुभव घ्यायचा होतारायगड हा पर्वत जसादुर्गमतसाच तो वास्तूंचा खजिनाइतर दुर्गांवर  दिसणारे प्रासादांचे आणि इमारतींचे अवशेष येथे आजही साक्ष देत उभे आहेतज्यांची शरीरे कष्टास समर्थ आहेतत्यांच्यासाठी 'पायवाटआणि ज्यांना शारीरिक मर्यादा आहेतत्यांच्यासाठी 'रज्जुमार्गाचीसोय उपलब्ध आहेहे जाणून मोहिमेचे घाट घातलेपूर्वी केलेल्या रायगड चढाईचा आमचा अनुभव आणि साक्षात वास्तुविशारद गोपाळ चांदोरकर यांच्याकडून प्रत्यक्ष गडावर श्रवण केलेलीत्यांनी केलेल्या सखोल अभ्यासातून उलगडलेली ऐतिहासिक महती या स्नेह्यांपर्यंत पोहोचवण्याची ही एक अपूर्व संधी आहेअसे मानून या मोहिमेचा श्रीगणेशा केला."

।। रसद आणि तजवीज ।।

"पुण्यनगरी ते दुर्गराज रायगड हे अंतर ७० कोसांच्या (१४० किमीसुमारास भरतेयेण्या-जाण्याचा हा पल्ला पार करताना वाहनधारकांचे हिशोब आणि तजवीज पाहणे अगत्याचे होतेवाहतूकदारांचे रीतीप्रमाणे ३०० किमीचे भाडे आकारले जात होतेपरंतु त्यात आमचा काही अंशी तोटा दिसत होताअशा समयी कचेरीतील एका अनुभवी कारभाऱ्याने (ज्येष्ठ सहकारीमध्यस्थी केली आणि १०,००० सुवर्णमुद्रांच्या (रुपयांच्यामर्यादेत हा सर्व प्रवासखर्च आणि वरखर्च बसवून दिला.

केवळ रथशाळेचीच (वाहतुकीचीनव्हेतर तळाला मुक्कामासाठी लागणाऱ्या छावणीची (Base Camp) व्यवस्थाही त्यांनी अत्यंत माफक दरात लावून दिलीदोन खोल्यांची व्यवस्था प्रति खोली २००० या दराने झाली आणि त्याच ठिकाणी अस्सल महाराष्ट्रीयन पंगतीचा (थाळीचाबेत १८० प्रति व्यक्ती असा निश्चित झालाआता अन्नाची आणि प्रवासाची नाहक चिंता दूर झाली होतीसर्व मावळे डोळे लावून त्या ११ तारखेची वाट पाहू लागले आणि पाहता पाहता तो मंगल दिन समीप आला..."

।। दुर्गप्रेमींचा मेळा ।।

"या रायगड भेटीसाठी ठिकठिकाणच्या स्नेह्यांचा एक 'मेळाजमलाही काही युद्धाची तयारी नव्हतीतर शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी निघालेली एक 'शांतीची वारीहोतीयामध्ये:

· पुण्यनगरीतून: दीक्षित आणि त्यांचे भाचे उत्साहाने सामील झाले

· आकुर्डी परिसरातून: गायकवाड आपल्या पत्नी आणि दोन कन्येसह या प्रवासास निघाले

· गहुंजे पंचक्रोशीतून: चव्हाण पती-पत्नी आपल्या लहान मुलीला शिवचरित्र दाखवण्यासाठी सोबत घेऊन आले

· भोसरी आणि मोशी प्रांतातून: जाधव भगिनी आपल्या पुत्रासहतसेच पारखी आणि वारके हे आपापल्या अर्धांगिनीसह या यात्रेत दाखल झाले.

असे हे एकूण १५ 'दुर्गप्रेमी', संसाराच्या व्यापातून वेळ काढूनसह्याद्रीच्या कुशीत विसावण्यासाठी आणि इतिहासाची पाने प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी एकत्र आले..."

।। कूच आणि प्रस्थान ।।

"मध्यान्ह उलटल्यावर चित्त कामात लागेनासे झालेसर्व स्नेही आपापले प्रवासाचे गाठोडे (समानबांधून सज्ज होत होतेसूर्यास्त समीप येत असतानासाडेपाच घटिकांच्या (:३०सुमारास कचेरीच्या द्वाराशी रथाचे (गाडीचेआगमन झालेउन्हाचा कडाका ध्यानी घेऊनप्रवासासाठी आणि गडाच्या चढाईसाठी लागणारी जलाची (पाण्याचीतरतूद आधीच करून ठेवली.

दीक्षितगायकवाडपारखीवारके आणि चव्हाण ही मंडळी वेळेत हजर झालीमात्र जाधव भगिनींच्या आगमनास काही अंशी विलंब झालानियोजित प्रस्थानाची वेळ टळून गेली होती आणि साडेसहाचा सुमार झाला होताअखेर सर्व मंडळी रथात आरूढ झाली आणि प्रवासाचा श्रीगणेशा झालाप्रवासाचा विलंब लक्षात घेऊनतातडीने तळाला (Base Camp) सांगावा धाडला कीपोहचण्यास उशीर होईलपरंतु भोजनाची पंगत १५ जणांचीच सिद्ध (तयारठेवावीअसा हा शिस्तबद्ध बेत आखून आमचा ताफा रायगडच्या दिशेने मार्गस्थ झाला..."

।। मार्गाक्रम आणि आनंदोत्सव ।।

"आमच्या रथाचे सारथी (ड्रायव्हरमोठे अनुभवी आणि जाणकार होतेहिंजवडीसारख्या गर्दीच्या ठिकाणाहून निर्विघ्नपणे मार्ग कसा काढावायाचे त्यांना उत्तम कसब होतेप्रवासाचा श्रीगणेशा होताच सारथी काकांनी साद घातली की, 'असे शांत काय बसलातकाही सुश्राव्य संगीत छेडा!' हे ऐकताच सर्व दुर्गप्रेमींच्या उत्साहाला उधाण आलेआधुनिक यंत्रांची (Mobile/Bluetooth) जुळवाजुळव झाली आणि गाडीत धडाकेबाज गीतांचा गजर सुरू झालामग कायअबालवृद्ध सर्व मंडळी रथातच ताल धरू लागलीड्रायव्हर काकांनी सुरुवातीलाच सर्वांमध्ये एक वेगळेच चैतन्य निर्माण केले. 'झटपट पटापटपासून ते नवनवीन गीतांपर्यंत सर्वच सुरावटींवर ठेका धरला गेलाआम्हासही नृत्याचा आग्रह झालापरंतु आमची त्या कलेत गती बेताचीच असल्याने आम्ही प्रेक्षक म्हणून आनंदी होतो.

रथ पौड परिसर सोडून मुळशीच्या अरण्याकडे वळलातशी दुर्गम भागामुळे संगीताची साथ सुटली (Network गेले). अवघ्या वातावरणात काही काळ नीरव शांतता पसरलीमुळशी येथे रथाचा विसावा झालातेथे पारखी यांच्या अर्धांगिनीने आपल्या सुगृहिणीपणाची साक्ष देत अत्यंत रुचकर 'पराठेसिद्ध (तयारकरून आणले होतेत्या पंगतीचा सर्वांनी यथेच्छ आस्वाद घेतलासोबत चहा-कॉफीचा आस्वाद घेतल्याने कचेरीतून निघताना लागलेली क्षुधा (भूकशांत झाली आणि शरीरात पुढील प्रवासासाठी नवा जोम संचारला..."

"मुळशीचा विसावा आटोपून आमचा रथ ताम्हिणी घाटाच्या रोखाने मार्गस्थ झालात्या घट्ट काळोखात मुळशीच्या विस्तीर्ण जलाशयात पलीकडच्या तीरावरील दीपांचे प्रतिबिंब एखाद्या सुवर्णकणांसारखे झळकत होतेते दृश्य मोठे विलक्षण भासत होतेअशातच पारखी स्नेह्यांनी 'नाट्यसंगीताचास्वर छेडलात्या सुरावटींनी अवघ्या वातावरणात जणू प्राण फुंकलेचहूकडे निबिड अंधारदूरवर कोठेतरी लुकलुकणारा अंधुक प्रकाश आणि त्या शांततेचा छेद घेणारा आमच्या रथाचा ध्वनीअसा हा सर्व योग मोठा मंतरलेला होतामनाला मोहवून टाकणारा हा प्रवास करीतघाटाची नागमोडी वळणे लीलया पार करून आमचा ताफा 'विलेप्रांतात (MIDC) दाखल झाला..."

"विले ओलांडल्यानंतर निजामपूरचे ठाणे लागलेयेथूनच दुर्गराज रायगडच्या दिशेने जाणारा नजीकचा मार्ग फुटतोपुण्यनगरीपासून निजामपूर हे साधारण पन्नास कोसांवर (१०० किमीअसल्यानेआता केवळ १५-२० कोसांचा (३०-३५ किमीटप्पा अवशिष्ट होतामार्ग जरी अल्प असलातरी तो मोठा फसववा आणि दुर्गम आहेनागमोडी वळणे आणि चढ-उतारांमुळे सारथ्याच्या कौशल्याची मोठी परीक्षाच होती.

जसजसे आम्ही गडाच्या समीप जात होतोतसे आमचे डोळे काळोखातही दुर्गराजाचे प्रथम दर्शन घेण्यास आतुर झाले होतेपरंतुतो निबिड अंधार भेदून काहीच दिसेनासे झालेअखेर साडेदहा घटिकांच्या (१०:३०सुमारास आमचा ताफा 'पाचाडया ऐतिहासिक भूमीत दाखल झालापाचाडमधूनही गडाचे दर्शन घडणे दुरापास्त होतेपरंतु शेवटच्या वळणावर आमचा रथ उभा ठाकला आणि साक्षात दुर्गराज रायगड समोर प्रकटलात्यानंतर मुक्कामाच्या छावणीची (Base-Camp) पुसपास केली आणि अवघ्या काही क्षणात आम्ही विश्रांतीच्या ठिकाणी सुखरूप दाखल झालो..."

।। आतिथ्य आणि नक्षत्रांचे कौतुक ।।

"पाचाड मुक्कामी नीलम ताई औकीरकर यांच्या गृही आमचा मुक्काम ठरला होतात्यांनी मोठ्या अगत्याने आमचे स्वागत केलेनिवासासाठी दोन स्वतंत्र दालने (खोल्यासिद्ध होतीएक पुरुषांसाठी आणि दुसरे सौभाग्यवतींसाठीप्रवासाचा काळ आणि रात्रीची वेळ यामुळे क्षुधा (भूकतीव्र झाली होतीविहित कर्माने हस्तप्रक्षालन उरकून आम्ही पंगतीला बसलोतेथे गरमागरम भाकरीअस्सल पिठले आणि मसुराची उसळ असा सात्विक बेत होतात्यांच्या हस्तकौशल्याने बनवलेल्या 'लोणच्यानेतर जेवणाची चव अधिकच वाढवलीत्या तृप्त भोजनानंतर सर्व मंडळी आबालवृद्ध सुखावली.

भोजनानंतर आम्ही निवासाबाहेर असलेल्या मोकळ्या प्रांगणात आलोतेथे साक्षात चंद्रमौळी चांदण्याचा लख्ख प्रकाश भूमीवर अवतरला होतामहानगरातील धुरामुळे  दिसणारे ते नक्षत्रांनी नटलेले आकाश पाहून अर्भके (मुलेविस्मित झालीमग त्यांना आधुनिक यंत्राच्या (Mobile App) साह्याने नभमंडळातील ग्रह-ताऱ्यांची ओळख करून दिलीसमोर तळपणारा तो तेजस्वी गोळा म्हणजे 'गुरु' (Jupiter) ग्रह आहे हे उमजताचत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाहीजणू काही त्यांना नभातील खजिनाच गवसलापरंतुदुसऱ्या दिवशीच्या मोहिमेसाठी देहास विश्रांतीची निकड होतीपहाटे ब्राह्ममुहूर्तावरम्हणजेच तीन घटिका (:००रात्री असताना उठण्याचा दंडक घालून आम्ही निद्रेच्या आधीन झालो..."

।। अंतराल: चित्तातील द्वंद्व )।।

"छावणीत शांतता पसरली आणि सर्व स्नेही निद्रेच्या आधीन झालेपरंतु आमच्या नयनी निद्रा नव्हतीमनामध्ये विचारांचे काहूर माजले होतेहे सर्व मावळे समयी जागे होतील कासुकुमार अर्भके आणि भगिनींना या निबिड अंधारात पल्ल्यावर नेणे धाडसाचे तर ठरणार नाही नादिनकर उगवण्यापूर्वी दुर्गराजाचे दर्शन घडेल कावाटेत कोणाचे धैर्य खचले तर काय करावेअसे अनेक तर्क-वितर्क मनात घोळत होतेअशा समयी समर्थांच्या ओळींचे स्मरण झाले आणि चित्ताला उभारी      मिळाली:

मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्रधर्म वाढवावा ॥

येविसीं न करितां तकवा । पूर्वज हांसती ॥१॥