Friday, May 08, 2026

दुर्गराज रायगड मोहीम वृत्तांत - भाग २: ( मोर्चेबांधणी )

 


।। मोर्चेबांधणी ।।

"पहाटे तीन घटिका रात्री असताना सारथी काकांनी साद घातली आणि सर्व मंडळींना जागृत केलेठरल्यानुसार अवघ्या एका प्रहरात सर्व जण मोहिमेसाठी सज्ज झालेगायकवाड यांची थोरली कन्या मोठ्या हिमतीने पायवाटेने   चढण्यास सिद्ध झालीतर गायकवाड  पती -पत्नी आणि त्यांची धाकटी कन्या यांनी रज्जुमार्गाने गडावर येण्याचे योजलेसारथी काकांनी आम्हास पहाटेच्या प्रहरात 'चित्त दरवाजाच्यापायथ्याशी आणून सोडले आणि खऱ्या मोहिमेचा श्रीगणेशा झाला!"

।। चित्त दरवाजा आणि चढाईचा श्रीगणेशा ।।

"पहाटेचा प्रहरसुमार साडेचार घटिकांची वेळवातावरणात शीतल गारवा पसरलेला होताविजेऱ्यांच्या (Torch) प्रकाशात आम्ही दुर्गराजाच्या पायऱ्या चढण्यास प्रारंभ केलायातील बहुतांश मंडळी दुर्गभ्रमंतीत नवीन असल्यानेत्यांना मोहिमेची काही शिस्त समजावून सांगणे अगत्याचे होतेआम्ही त्यांना पुढीलप्रमाणे ताकीद दिली:

· चढाई करताना उतावीळपणा करू नयेशांत चित्ताने पावले टाकावीत. · श्वास आणि गती यांचा मेळ घातल्यास चढाई सुसह्य होते. · तृष्णा (तहानलागल्यास जलाचे एकदम प्राशन करू नयेतर काही काळ थांबून घोट-घोट पाणी घ्यावेजेणेकरून देहात ऊर्जा टिकून राहील. · हा दुर्ग म्हणजे आमचे दैवत आणि पवित्र स्थान आहेयेथे कोठेही अस्वच्छता किंवा कचरा करू नये. · कुणीही समूहापासून अलिप्त होऊ नयेसर्वांनी एकजुटीने मार्गक्रमण करावे.

पारखी स्नेह्यांना फळीचे नेतृत्व करण्यास सांगितले आणि आम्ही स्वतः सर्वात शेवटी 'राखणदारम्हणून राहण्याचे निश्चित केलेजेणेकरून कोणाचीही साथ सुटणार नाही..."

"खुबलढा बुरुजाच्या समीप येताच काही काळ दमछाक झालीपरंतु अल्प विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा लय साधलीयावेळी आम्ही स्मरणात असलेला गडाचा इतिहास स्नेह्यांना सांगण्यास प्रारंभ केलाप्रथम दृष्टीस पडतो तो हा 'खुबलढा बुरुज'. येथे प्राचीन काळी दरवाजा असल्याचे अवशेष आजही साक्ष देतातविशेष म्हणजेही काही दुर्गाची मुख्य वाट नव्हेमुख्य वाट 'नाणे दरवाजाचीअसून आम्ही विजेरीच्या प्रकाशाने त्या अरण्यातील वाटेचा रोख सर्वांना दाखवला.

याच समयी झाडांच्या सावलीत काहीतरी सळसळ झाल्याचे पारखी स्नेह्यांच्या ध्यानी आले आणि पावले जागीच खिळलीनीट निरखून पाहिलेतेव्हा साक्षात 'गोमातेचेदर्शन झाले आणि भीतीचे रूपांतर हास्यविनोदात झालेचहूकडे निबिड अंधार आणि केवळ आमच्या विजेऱ्यांचा तो प्रकाश... अशा मंतरलेल्या स्थितीत 'मधल्या मोर्चाच्याजागी आम्ही कधी येऊन ठेपलोयाचे भानही राहिले नाहीयाच स्थानी नाणे दरवाजाची पुरातन वाट येऊन मुख्य मार्गाला मिळते..."

"मधल्या मोर्चावरून पुढचे मार्गक्रमण साक्षात 'हिरकणीकड्याच्या पायथ्याशी असलेल्या वाटेने झालेयेथपर्यंतच वायुदेवाची (वाराझुळूक अंगाला स्पर्श करीत होतीत्यानंतर रायगडला उजव्या अंगाला ठेवून आमचा ताफा पुढे सरकू लागलाआता सर्वांच्या पाऊलांची लय उत्तम जमली होतीनभमंडळात प्रकाशाची किरणे दिसू लहान-थोरांच्या चेहऱ्यावर उमटू लागली आणि वाटही काहीशी समतल झालीया स्थानी विसावा घेऊन प्रत्येकाने एक-एक 'कदलीफल' (केळेग्रहण केलेज्यामुळे देहात तत्काळ ऊर्जा संचारली.

पहाट झाली होती आणि नभात गुलाबी रंगाची अपूर्व छटा उमटली होतीटकमक टोकाच्या पाठीमागे ते गुलाबी-नीलवर्ण आकाश आणि शीतल मंद वारामोठा अद्भुत योग होतापरंतुहीच ती वेळ होती जेव्हा उमजले कीगडावर जाऊन सूर्योदय पाहण्याचे भाग्य आज लाभणार नाहीमहादरवाजाचा भव्य बुरुज आता दृष्टीस पडला आणि पुन्हा एकदा खडी चढण सुरू झालीमार्गस्थ होत असताना इतर काही यात्रेकरूंचीही सोबत लाभलीसव्वासात घटिकांच्या (:४५सुमारास आम्ही महादरवाजापाशी पोहोचलोसंथ चालीमुळे भास्कर उगवताना (सूर्योदयपाहता आला नाहीयाचे शल्य मनात होतेपण तेथील अल्हाददायक हवेत ते विरून गेलेवर्तमानकाळी गडाची महाद्वारे सकाळी सात घटिकेला (:००उघडतातअसा दंडक आहेराजांच्या काळी ही द्वारे सूर्योदयाच्या समयी उघडत असतपण काळाच्या ओघात झालेले हे बदल आता स्वीकारावे लागतातअवघ्या १५ निमिषांची (मिनिटेप्रतीक्षा उरली होती..."




।। महाद्वाराचे गांभीर्य आणि दुर्गशास्त्राचा अजब नमुना ।।

"महाद्वारज्याची भव्यता पाहूनच देह भारावून जातोया अजस्त्र द्वारावरील लोखंडी खिळे आणि नक्षीकाम म्हणजे कारागिरीचा कळसअंतर्यामी असा प्रश्न उभा राहिला कीया गिरीदुर्गावर हत्तीची धडक बसणे अशक्यप्राय असताना हे लोहखिळे का जडले असावेतद्वारापूर्वी असलेल्या त्या दीड-दोन वितीच्या उंच पायऱ्या हत्तीची गती रोखण्यास समर्थ आहेतमग या खिळ्यांचे प्रयोजन कायतरशत्रूने स्वप्नातही या द्वाराला गजराजाच्या बळाने भेदण्याचे धाडस करू नयेअशी ही जरब बसवणारी रचना आहे!

या महाद्वाराचे अजब वैशिष्ट्य म्हणजे दोन बुरुजांच्या कुशीत दडलेली 'गोमुखीरचनाशत्रूने कितीही निकड लावली तरी त्याला धावत येऊन धडक देण्यास कणभरही वाव नाहीलाकडी ओंडके (रामवापरून द्वार पाडणे तर सुतराम अशक्यअशा या बुद्धिवान रचनेचा उंबरा चढताना नतमस्तक होणेहे प्रत्येक शिवभक्ताचे कर्तव्यच आहेद्वार ओलांडताच डावीकडे पडणारे ते चतुर वळण पाहून थक्क व्हायला होतेधन्य ते दुर्गबांधणीचे विचार आणि धन्य ते आमचे राजे!..."





।। जलास्त्र आणि दुर्गशास्त्राची अजब रणनीती ।।

"महाद्वार ओलांडून आत प्रवेश केला तरी दुर्गराजाचा माथा अजून समीप नसतोअंतर्भागी दोन प्राचीन बुरुज दृष्टीस पडतातजे जुन्या 'रायरीकिल्ल्याची साक्ष देतातयेथून पुढे दोनशे पायऱ्यांची खडी चढण अद्याप उरलेली असतेयाच स्थानी गुप्त आणि अत्यंत विलोभनीय अशी एक संरक्षण योजना दडलेली आहे.

महाद्वाराच्या ऊर्ध्व (वरच्याभागात जलाचा साठा करण्यासाठी एक भिंत उभारून बंधारा घातला आहेही भिंत मध्यम स्वरूपाची असून गरजेनुसार ती कोसळता येईल अशी त्याची रचना आहेजर शत्रूने निकराने महाद्वाराचा उंबरठा ओलांडलाचतर हा बंधारा फोडून जलाचा प्रचंड लोंढा सोडण्याची योजना होतीतो पाण्याचा प्रवाह शत्रू सैन्याला आपल्या वेगात खेचून थेट दीड   दोनशे फूट खोल दरीत फेकून देण्यास समर्थ होताजलदेवतेचा अस्त्र म्हणून वापर करणारे हे दुसरे छत्रपतीयापूर्वी स्वराज्य संस्थापक शहाजीराजे भोसले यांनी भातवडीच्या रणांगणावर धरणाचे पाणी सोडून शत्रूचा संहार केला होतापित्याचा तोच वारसा शिवरायांनी रायगडाच्या या दुर्गम रचनेत जतन केला आहेहे पाहून मती कुंठित होते..."

।। लोहस्तंभ आणि हत्ती तलावाचा इतिहास ।।

"महाद्वाराचा टप्पा पार पडताच लहान-थोरांचा आनंद द्विगुणित झालापूर्वीचा मार्ग गंगासागराच्या तीरावरून जात असेमात्र सांप्रत काळी हत्ती तलावाच्या अंगाने सुलभ वाट सिद्ध केली आहेया मार्गावर मार्गक्रमण करताना वाम (डाव्याभागास एक विशाल लोहस्तंभ दृष्टीस पडतोया स्तंभाचे यथार्थ प्रयोजन काय असावेयाचे कोडे अद्याप सुटलेले नाहीत्यावर काही प्राचीन अक्षरे उत्कीर्ण (कोरलेलीआहेतपरंतु ती वाचणे दुरापास्त आहेजाणकार याला 'हत्तीपागाम्हणताततर काही याला कालगणना करणारे 'सूर्ययंत्र' (सूर्यघटिकामानतात.

असाच लोहस्तंभ राजमाचीच्या दुर्गम स्थानीही पाहण्यास मिळतोया स्तंभाचे रहस्य उलगडण्यासाठी अन्य दुर्गांचाही शोध घेणे अगत्याचे आहेतेथून पुढे सरकताच आम्ही अथांग 'हत्ती तलावा'पाशी येऊन ठेपलोअभ्यासकांच्या मतेयाला पूर्वकाळी 'हतातलाव म्हणत असत, ज्याचा अर्थ ज्याने जल साठवण्याचे सामर्थ्य गमावले आहे असाकाळाच्या ओघात याचे नामकरण 'हत्ती तलावझालेया तलावाच्या डाव्या कुशीत पाण्याचे एक सुंदर बांधीव टाके आजही पर्यटकांची तृष्णा भागवत उभे आहे..."





।। शिर्काई देवीचे दर्शन आणि भूतदया ।।

"हत्ती तलावाचा परिसर सोडून पुढे मार्गस्थ होतानाएका श्वानशावकाने (कुत्र्याच्या पिल्लानेआमची वाट रोखलीते निरागस पिल्लू पाहून वारके उभयतांना परम आनंद झाला आणि त्यांनी मायेने त्यास उचलून घेतलेत्या मुक्या प्राण्यास अन्नदान करून आम्ही पुढे सरकलोतोच गडाची अधिष्ठात्री 'श्री शिर्काई देवीचेस्थान दृष्टीस पडले.

हे शिर्क्यांचे कुलदैवतशिवपूर्व काळी जेव्हा हा दुर्ग शिर्क्यांच्या ताब्यात होतातेव्हापासून हे शक्तीपीठ येथे जागृत आहेश्रीमंत छत्रपती शिवरायांनी देखील या देवतेस 'भवानीस्वरूप मानून तिची सेवा -अर्चा अविरत चालू ठेवलीदेवीच्या गाभाऱ्याभोवती चिरेबंदी दगडांची भिंत आणि सुबक फाटक उभारले आहेआजही येथे नित्यनेमाने पूजा -अर्चा संपन्न होतेहे पाहून समाधान वाटलेयाच स्थानी इतरही काही प्राचीन मूर्ती असूनमहाराणी पुतळाबाईसाहेब यांची 'सतीची शिळाशिवकाळातील त्या त्यागाची आणि निष्ठेची साक्ष देत उभी आहे..."




।। राजप्रासाद दर्शन आणि जिव्हाळ्याची भेट ।।

"मार्गाक्रमणा प्रेक्षणीय होऊ लागलीसमोरच राजप्रासादाची ती भव्य वास्तू नयनांचे पारणे फेडू लागलीएका बाजूस अफाट 'होळीचा माळतर दुसऱ्या बाजूस अथांग 'गंगासागरडोलत होताते उंच मनोरे पाहून मती गुंग होत होतीहोळीच्या माळावर विराजमान असलेल्या शिवछत्रपतींच्या सिंहासनारूढ मूर्तीस दंडवत घालून सर्व जण नगाडाखान्याकडे वळले.

घटिका :३० ची झाली होतीसूर्यदेव प्रखर होऊ लागल्यानेरज्जूमार्गाने येणाऱ्या गायकवाड परिवाराची प्रतीक्षा करणे श्रेयस्कर वाटलेनगाडाखान्याचा बेत घटकाभर बाजूला सारून वृक्षाच्या छायेखाली विसावा घेतलात्याच वेळी पारखी यांनी अल्पोपहाराची तजवीज केलीतेवढ्यात गायकवाड मंडळी आपल्या धाकट्या कन्येसह येताना दिसलीथोरली भगिनी गडावर आधीच पोहोचल्याचे पाहून धाकटीने आनंदाने मोठी धाव घेतलीजणू काही प्रत्यक्ष भेटीचा सोहळाच तिथे रंगला!

जठराग्नी प्रदीप्त झाल्याने सर्व मंडळी बाजारपेठेच्या मागील बाजूस असलेल्या वस्तीकडे वळलीसह्याद्रीच्या वारा-पावसाशी झुंज देणारी ती बुटकीचिरेबंदी घरेनम्र होऊन (वाकूनत्या घरात प्रवेश केलातेथे गृहिणीने चुलीवर पोह्यांचे आधण चढवले होतेघराचे अंतरंग प्रशस्त असून सर्व राबता तिथे विसावलाअवघ्या काही क्षणांत चुलीवरचा तो स्वाद आणि वाफाळलेला चहा समोर आलाज्याने प्रवासाचा सर्व शीण हरण केला..."



।। श्री जगदीश्वर दर्शन आणि निष्ठावंत हिरोजी ।।

"अल्पोपहार आटोपून सर्व मंडळी श्री जगदीश्वराच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मार्गस्थ झालीघटिका १०:३० ची झाली होतीतरी सूर्याचा प्रताप वाढला होतामार्गाच्या दोन्ही बाजूस प्राचीन वाड्यांचे आणि इमारतींचे अवशेष गतवैभवाची साक्ष देत होतेगडाच्या संवर्धनाचे कार्यही तेथे निकराने सुरू असल्याचे दृष्टीस पडले.

होळीच्या माळावरूनच या मंदिराचे शिखर आणि त्यावरील इस्लामी स्थापत्यशैलीचा प्रभाव असलेले घुमट लक्ष वेधून घेतातमंदिराच्या पश्चिमेकडून होणारा तो अरुणोदय पाहण्याचे भाग्य आता दुर्मिळ झाले आहेया मंदिराभोवती वीस हातांची उत्तुंग तटबंदी असून पूर्व-पश्चिम दोन महाद्वारे आहेतआम्ही मागील द्वाराने अंतर्भागात प्रवेश केलातेथील प्रशस्त प्रांगण आणि चहूकडील ओवऱ्या पाहून मन प्रसन्न झालेमंदिरात पवनपुत्र मारुतीरायांचे दर्शन घेऊन आम्ही गाभाऱ्यात प्रवेश केलाजिथे साक्षात महादेव शिवलिंग स्वरूपात विराजमान आहेतत्या पाषाणी भिंतींच्या शीतल छायेखाली प्रवासाचा सर्व ताप हरण झाला.





याच स्थानी जाधव भगिनींच्या सुपुत्राने त्या ऐतिहासिक पायरीबद्दल पृच्छा केलीगड चढताना त्यास दिलेले वचन पूर्ण करण्याची वेळ समीप आली होतीआम्ही मंदिराच्या पूर्व द्वाराकडे वळलोत्या द्वाराच्या पायरीवर निष्ठेचे प्रतीक असलेला तो कोरीव लेख दृष्टीस पडला— 'सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर'!

ज्या हिरोजींनी आपल्या कौशल्याने रायरीचा 'रायगडकेलात्यांनी आपली ओळख राजांच्या चरणी 'पायरीहोऊनच दिलीहे पाहून ऊर भरून आलाया द्वाराच्या कुडीवर (भिंतीवरइंदुलकरांनी केलेल्या महान कार्याचा वृत्तांत संस्कृत आणि मराठी भाषेत शिलालेखाच्या रूपाने कोरलेला आहेतो शिलालेख वाचताना त्या काळातील अभेद्य बांधकामाची प्रचिती येते..."




   श्रीगणपतये नमः 

  

प्रासादा रुचिरविचित्रशालिभद्रेः राजन्ते परिखासुवर्णखचितापीयूषपूर्णैस्तटेः  

वापीकूपतडागशादूलवरैरुद्यानराजिस्तथा तन्मे मेरुगिरौ चकास्ति सुकृता श्रीजुनार्दनस्यज्ञया 

  

शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे  ज्योतिराजमुहूर्तकीर्तिमहिते शुक्लेशपक्षातिथौ  वापीकूपतडागराजिरुचिरं रम्यं वनं वीथिको  स्तम्भैः कुम्भिगृहैर्नरेन्द्रसदनैरभ्रंलिहेर्मोहिते  श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो  यावच्चंद्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते 

शिलालेखाचा भावार्थ:

पहिला श्लोक: "जणू स्वर्गातील मेरू पर्वतावरच हे सुंदर वाडेविहिरीतलाव आणि बागांची निर्मिती झाली आहेचहूकडे सुवर्णखचित तटबंदी आणि अमृतासारख्या (स्वच्छपाण्याने भरलेले काठ शोभून दिसत आहेतहे सर्व महान कार्य श्री जगदीश्वराच्या (जनार्दनाच्याकृपेने आणि राजांच्या आज्ञेने साकार झाले आहे."

 कालगणना (पहिली ओळ):

·         शाके-षण्-णव-बाण-भूमि: ही अक्षरी संख्या आहेसंस्कृतमधील 'अंकानां वामतो गतिः' (अंक उजवीकडून डावीकडे वाचावेतया नियमानुसार:

o    भूमि (पृथ्वी): 

o    बाण: 

o    णव (नऊ): 

o    षण् (सहा): 

o    अर्थात शके १५९६ (ज्या वर्षी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला).

·         आनन्दसंवत्सरे: आनंद नाम संवत्सर चालू असताना.

·         ज्योतिराज-मुहूर्त-कीर्तिमहिते: ज्योतिषांनी काढलेल्या राज्याभिषेकाच्या त्या शुभ मुहूर्तावर आणि कीर्ती पसरलेल्या वेळी.

·         शुक्लेशपक्षातिथौ: ज्येष्ठ शुद्ध (शुक्लपक्षाच्या तिथीला.

बांधकामाची यादी (दुसरी ओळ):

·         वापी-कूप-तडाग: वापी (पायऱ्यांच्या विहिरी/बारव), कूप (विहिरीआणि तडाग (तलाव/सरोवर).

·         रुचिरं रम्यं वनं: अत्यंत सुंदर आणि रमणीय अशी वनराई (बागा).

·         वीथिको: प्रशस्त रस्ते किंवा बाजारपेठेतील गल्ल्या.

·         स्तम्भैः: भव्य खांब (उदानगाडाखान्यातील किंवा राजसभेतील).

·         कुम्भिगृहैः: 'कुम्भिम्हणजे हत्तीहत्तींसाठीची घरे म्हणजेच 'हत्तीशाळा' (Elephant Stables).

·         नरेन्द्रसदनैः: 'नरेन्द्र' (राजा/नरांचा इंद्रआणि 'सदन' (घर) - म्हणजेच राजांचे वाडे किंवा राजप्रासाद.

·         अभ्रंलिहेर्मोहिते: 'अभ्रंलिहम्हणजे ढगांना स्पर्श करणारे किंवा गगनाला भिडणारे (Sky-touching). ढगांना भिडणाऱ्या या वास्तूंनी मन मोहून टाकले आहे.

निर्मात्याचे नाव आणि संकल्प (तिसरी ओळ):

·         श्रीमद्रायगिरौ: या श्रीमंत (वैभवशालीरायगडावर.

·         गिरामविषये: 'गिराम' (वाणीआणि 'अविषये' (विषय नसलेला) - म्हणजेच ज्याचे वर्णन करायला शब्दही अपुरे पडतील असा (Beyond words).

·         हीराजिना निर्मितो: 'हीराजिम्हणजेच हिरोजी (इंदुलकर) यांनी हे सर्व निर्माण केले आहे.

·         यावच्चंद्रदिवाकरौ: जोवर आकाशात चंद्र आणि दिवाकर (सूर्यप्रकाशत आहेत.

·         विलसतस्तावत्समुज्जृंभते: तोवर ही कीर्ती आणि हे बांधकाम असेच दिमाखात राहो!



दुर्गराज रायगड मोहीम वृत्तांत - भाग १: ( संकल्प, कूच आणि पाचाडचा विसावा)

No comments: